जि.प. प्राथमिक शाळांना शिक्षकांच्या रिक्त पदाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:01 IST2021-09-02T05:01:06+5:302021-09-02T05:01:06+5:30

केशोरी : पंचायत समिती अर्जुनी मोरगाव अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा केशोरी येथे विद्यार्थी पटसंख्येच्या प्रमाणात पायाभूत ...

Z.P. Assumption of vacant posts of teachers to primary schools | जि.प. प्राथमिक शाळांना शिक्षकांच्या रिक्त पदाचे ग्रहण

जि.प. प्राथमिक शाळांना शिक्षकांच्या रिक्त पदाचे ग्रहण

केशोरी : पंचायत समिती अर्जुनी मोरगाव अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा केशोरी येथे विद्यार्थी पटसंख्येच्या प्रमाणात पायाभूत मुख्याध्यापक पदासह पाच शिक्षकांची पदे मंजूर आहेत. येथील मुख्याध्यापकांचे कोरोनाने निधन झाल्याने येथील एक शिक्षकाचे पद रिक्त आहे. रिक्त पद त्वरित भरण्यात यावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव घेऊन करण्यात आली. पण ती अद्यापही भरण्यात आली नाही. त्यामुळे शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे.

केशोरी येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेत वर्ग १ ते ४ पर्यंत वर्ग आहे. या परिसरातील अत्यंत चांगली शाळा म्हणून ओळख आहे. ही शाळा केंद्र शाळा असल्याने येथील एक शिक्षक शालेय माहिती जमा करण्यात गुंतलले असतात. येथील मुख्याध्यापकाचे मागील काही महिन्यांपूर्वी कोरोनाने निधन झाले तर शिक्षकाचे एक पद रिक्त आहे. येथील विद्यार्थी ज्ञानार्जनात मागे पडू नये म्हणून या उदात्त हेतूने येथील कार्यरत शिक्षक ऑनलाइन शिक्षण प्रणालीसह प्रत्यक्ष गावात जाऊन शिक्षण आपल्या दारी ‘हा उपक्रम नियमित राबवित आहेत. परंतु येथे एक शिक्षकाचे पद रिक्त असल्याने विद्यार्थी प्रमाणात शालेय उपक्रम राबविण्यासाठी कमालीच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एक ना धळ भाराभर चिंध्या, अशी शिक्षणाची अवस्था झाली आहे. तरी येथील रिक्त असलेले शिक्षकाचे पद त्वरित भरण्यात यावे अन्यथा शाळेला कुलूप ठोकून शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुणेश काडगाये यांनी दिला आहे.

Web Title: Z.P. Assumption of vacant posts of teachers to primary schools