जि.प. शाळेत महिला मेळावा

By Admin | Updated: March 12, 2017 00:20 IST2017-03-12T00:20:18+5:302017-03-12T00:20:18+5:30

स्थानिक महिला समितीच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या समारोहाचे औचित्य साधून जि.प. केंद्रीय

Zip Women's rally in school | जि.प. शाळेत महिला मेळावा

जि.प. शाळेत महिला मेळावा

केशोरी : स्थानिक महिला समितीच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या समारोहाचे औचित्य साधून जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेच्या प्रांगणात महिला मेळाव्यासह विविध कार्यक्रम घेतले.
सामाजिक कार्यकर्त्या सुनिता हुमे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात मुख्य मार्गदर्शक म्हणून लोकमत सखी मंचच्या अर्जुनी मोरगाव तालुका संयोजिका ममता भैय्या तर उद्घाटक म्हणून पद्मजा मेहंदळे उपस्थित होत्या. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून सरपंच अश्विनी भालाधरे, पं.स. सदस्य शिशुकला हलमारे, गिता बडोले, कल्पना रेहपांडे, सरपंच सकुंतला वालदे, गोठणगाव ग्रामपंचायतच्या सदस्य ममता समरीत, गीता शिखरामे, रेखा गायकवाड, स्रेहा झोडे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रास्ताविकातून महिला समितीच्या अध्यक्ष भारती दहीकर यांनी दरवर्षी राबवित असलेल्या विविध कृतिशिल उपक्रमांची माहिती दिली. ममता भैय्या यांनी लोकमत परिवाराकडून स्त्रियांसाठी सखीमंच सारखे मोठे व्यासपिठ निर्माण केले आहे. त्याचा लाभ स्त्रियांनी सखी मंचचे सदस्य बनून घ्यावा, असे आवाहन केले. उद्घाटनपर भाषणामधून पद्मजा मेहंदळे यांनी महिलांनी आपल्या जीवनात स्वच्छतेला अधिक महत्व दिले पाहिजे. वेळोवेळी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणामधून सुनिता हुमे यांनी स्त्रीमुळेच शिक्षणाचा खऱ्या अर्थाने प्रसार व प्रचार झाल्याचे सांगितले.
यावेळी महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, व्यंजन स्पर्धा, स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धा, दोर उडी स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेवून रात्रीला सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना पाहुण्यांचे हस्ते पारितोषिक प्रदान करुन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रजनी झोडे यांनी केले तर आभार सोनाली तांदळे यांनी व्यक्त केले. सदर महिला मेळावा यशस्वी करण्यासाठी फरजाना पठाण, निता काडगाये, वैशाली शेंडे, नलिनी पेशने, संगिता शेंडे, लिना यावलकर, रेष्मा शेंडे, विद्या धांडे यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)

Web Title: Zip Women's rally in school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.