शिक्षकांच्या बदल्यांसाठी जि.प.ला लगीनघाई
By Admin | Updated: May 24, 2014 23:43 IST2014-05-24T23:43:18+5:302014-05-24T23:43:18+5:30
बालकांना मोफत व शक्तीचे शिक्षण देण्याचा अधिनियम शासनाने सन २00९ मध्ये काढला. यासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयानुसार पटसंख्या निश्चितीनंतर शिक्षकांचे समायोजन करायचे होते.

शिक्षकांच्या बदल्यांसाठी जि.प.ला लगीनघाई
गोंदिया : बालकांना मोफत व शक्तीचे शिक्षण देण्याचा अधिनियम शासनाने सन २00९ मध्ये काढला. यासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयानुसार पटसंख्या निश्चितीनंतर शिक्षकांचे समायोजन करायचे होते. व त्यानंतर शिक्षकांच्या बदल्या करायच्या होत्या. या संदर्भात १५ मे २0१४ च्या शासन परिपत्रकानुसार शिक्षकांच्या बदल्या बाबत यथावकाश निर्णय घ्यावा, असे स्पष्ट असताना जि.प.च्या शिक्षण विभागाने शिक्षकांना मोबाईलव्दारे संदेश पाठवून २१ मे ला कार्यशाळा असल्याचे निर्देश दिले. यामुळे जि.प. ला शिक्षकांच्या बदल्यांबाबत लगीनघाई असल्याचे निदर्शनात येत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या पदाधिकार्यांनी केला आहे. जि.प.ने आयोजित या कार्यशाळेला शेकडो शिक्षक उपस्थित झाले होते. जिल्ह्यात आधी आरटीई लावून शिक्षक व विद्यार्थी संख्येनुसार उच्चश्रेणी मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व सहायक शिक्षकांचे समायोजन करायचे असते. समायोजन करताना शिक्षकांची कार्यशाळा घेऊन त्यांच्या इच्छेनुसार शाळा व पंचायत समित्याही बदल करता येतील. यामुळे समायोजनाबरोबर बदल्यांचा हेतु साध्य करता येईल. मात्र बदल्याचा नावावर संदेश पाठवून सुट्यामध्ये दुसर्या गावी किंवा दुसर्या जिल्ह्यामध्ये वास्तव्यास असलेल्या शिक्षकांना बोलावण्यात आल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागला. गोंदिया जिल्हा परिषदेने शिक्षणाचा अधिकार अधिनियम लक्षात ठेवून शिक्षकांचे समायोजन करताना शिक्षकांना विश्वासात घेण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षीत, कार्याध्यक्ष शेषराव येडेकर, सरचिटणीस एल.यु. खोब्रागडे, उपाध्यक्ष किशोर डोंगरवार, जिल्हा संघटक सुरेश रहांगडाले, कोषाध्यक्ष एस.सी. पारधी, पी.आर. पारधी, अरुण दीप, सुनील बावनकर, जी.आर. मेश्राम, नीलकंठ बिसेन, संदीप तिडके, जी.आर. बांते, सतीश दमाहे, ओ.जे. वासनिक, डी.आर. जिभकाटे, के.के. नेवारे, नरेश बडवाईक, डब्ल्यू.बी. भानारकर, वाय.डी. चव्हाण, टेलन बंसोड यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)