जिल्हा परिषदेच्या ५८ शाळा इमारती कौलारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:31 IST2021-08-23T04:31:22+5:302021-08-23T04:31:22+5:30

अर्जुनी मोरगाव : गोंदिया जिल्हा परिषदेद्वारा चालविण्यात येत असलेल्या ५८ शाळांच्या इमारती कौलारू आहेत. १३८ शाळांच्या इमारतीवरून जिवंत विद्युत ...

Zilla Parishad's 58 school buildings Kaularu | जिल्हा परिषदेच्या ५८ शाळा इमारती कौलारू

जिल्हा परिषदेच्या ५८ शाळा इमारती कौलारू

अर्जुनी मोरगाव : गोंदिया जिल्हा परिषदेद्वारा चालविण्यात येत असलेल्या ५८ शाळांच्या इमारती कौलारू आहेत. १३८ शाळांच्या इमारतीवरून जिवंत विद्युत तार गेल्याने संभाव्य धोका, खोडशिवणी येथे ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र व मुरदोली येथील पर्यटन संकुल, आदी प्रश्न जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी पालकमंत्री नवाब मलिक यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी याकडे लक्ष देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन विकास समितीची सभा पार पडली. या बैठकीत खा. प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली. जिल्ह्यातील ५८ शाळांच्या इमारती कौलारू आहेत. गावात माकडांचा उच्छाद व वादळी वाऱ्यामुळे कौलांचे नुकसान होते. यामुळे शैक्षणिक कार्यात अडचण निर्माण हाेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होते. कौले तयार करण्याचे कारखाने बंद झाले आहेत. कौलारू शाळांच्या इमारतींवर सिमेंट प्रोफाइल शीट बसवून शाळा दुरुस्ती कराव्यात. राज्य महामार्ग ७५३ वरील मुरदोली गावाजवळ पर्यटन सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडून गट क्र. १५७ आराजी १.९४ हे आर पैकी ०.३६ आर जमीन जिल्हा परिषदेला मागणी केली होती. जिल्हा परिषदेने १९ सप्टेंबर २०१९ च्या सर्वसाधारण सभेत ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे मान्य करून तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. यावर अद्यापही कुठलीच कार्यवाही झाली नसल्याने एमटीडीसीने काम केले नाही. ते तातडीने करण्यात यावे. खोडशिवणी येथे ३३ केव्ही ट्रान्स्फॉर्मर लावण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. त्याला तातडीने मान्यता देण्यात यावी, आदी प्रश्न जिल्हा नियोजन विकास समितीचे सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी पालकमंत्र्यांसमोर उपस्थित केले. पालकमंत्री मलिक व खासदार पटेल यांनी या समस्यांचे निराकरण लवकर व्हावे अशा सूचना सभेत दिल्या.

Web Title: Zilla Parishad's 58 school buildings Kaularu