जिल्हा परिषद हायस्कूल ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:13 IST2021-01-24T04:13:08+5:302021-01-24T04:13:08+5:30
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ए. पी. मेश्राम होते. पाहुणे म्हणून डी. पी. डोंगरवार, एस. सी. फुंडे, डब्लू. एम. परशुरामकर, जी. बी. ...

जिल्हा परिषद हायस्कूल ()
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ए. पी. मेश्राम होते. पाहुणे म्हणून डी. पी. डोंगरवार, एस. सी. फुंडे, डब्लू. एम. परशुरामकर, जी. बी. डोंगरवार, व्ही. पी. आगाशे, आर. जी. पुस्तोडे उपस्थित होते. मुख्याध्यापक मेश्राम यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शालेय विद्यार्थी आणि शिक्षक डी. पी. डोंगरवार यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित माहिती सांगितली. मुख्याध्यापक मेश्राम यांनी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान क्रांतिकारक कार्याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा. युवकांनी त्यांचे विचार आत्मसात करून देशसेवेसाठी योगदान दिले पाहिजे. असे आवाहन करून आजही सुभाषचंद्र बोस यांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी आहेत, असे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन गिरेपुंजे यांनी केले. आभार आगाशे यांनी मानले. कार्यक्रमासाठी के. पी. हुकरे, प्राची मेंढे, आय. वाय. रहांगडाले, युवराज मौदेकर, निंबेकर, मारबते यांनी सहकार्य केले.