जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या हालचाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:53 IST2021-02-18T04:53:51+5:302021-02-18T04:53:51+5:30

राजकीय पक्षांसाठी निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. पक्षाचे प्रमुख गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांना भेटून चर्चा करीत आहेत. अलीकडील निवडणुकांनंतर ...

Zilla Parishad and Panchayat Samiti elections begin | जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या हालचाली सुरू

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या हालचाली सुरू

राजकीय पक्षांसाठी निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. पक्षाचे प्रमुख गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांना भेटून चर्चा करीत आहेत. अलीकडील निवडणुकांनंतर निवडणुका लढविलेल्या संभाव्य उमेदवारांनी मतदारांचे मन वळविण्यास सुरुवात केली आहे. इच्छुकांकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती नीट ढवळून घेण्यास सुरुवात झाली आहे. जुन्यासोेबतच नवीन चेहरेही निवडणुकीत उतरण्याची तयारी करण्यास उत्सुक दिसत आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधी ते जुन्या दावेदारांपर्यंत नवीन दावेदारही पुढे येत आहेत. चहाच्या दुकानांपासून चौकाचौकांत संभाव्य उमेदवारांविषयी चर्चा सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार मतदारांचा शोध घेत आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधींच्या कामकाजावर चर्चा होत आहे. त्याचवेळी, विरोधक त्यांचे दोष दाखवीत आहेत. एकूणच, आगामी निवडणुकांवर चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: Zilla Parishad and Panchayat Samiti elections begin