एसटीच्या धडकेत युवक जखमी

By Admin | Updated: July 23, 2016 23:57 IST2016-07-23T23:57:05+5:302016-07-23T23:57:05+5:30

तिरोडापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या भुराटोला नाल्याजवळ सकाळी १०.३० वाजता एसटीच्या धडकेत एक दुचाकीस्वार युवक जखमी झाला.

Youth wounded in ST drags | एसटीच्या धडकेत युवक जखमी

एसटीच्या धडकेत युवक जखमी

परसवाडा : तिरोडापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या भुराटोला नाल्याजवळ सकाळी १०.३० वाजता एसटीच्या धडकेत एक दुचाकीस्वार युवक जखमी झाला.
खैरलांजी येथील शिवशंकर होलू क डव (४५) हे दुचाकी क्रमांक एमएच ३५/टी ८३११ ने तिरोडाकडे जात असताना भुराटोला नाल्याजवळ तिरोडा-धापेवाडा एसटी बस क्रमांक एमएच ४०/एन ८५९० ने त्यांना धडक दिली. यात कडव जखम झाले असता चालक पराडकर व वाहक लोकेश कुंभलकर यांनी रूग्णवाहिका बोलावून त्यांना तिरोडा उप जिल्हा रूग्णालयात पाठविले. मात्र त्यांचा एक पाय तुटल्याने त्यांना गोंदियाच्या केटीएस रूग्णालयात पाठविण्यात आले. तिरोडा पोलीस तपास करीत आहे. (वार्ताहर)

 

Web Title: Youth wounded in ST drags