युवकांनी ऐच्छिक रक्तदानात पुढाकार घ्यावा- धकाते

By Admin | Updated: October 12, 2014 23:36 IST2014-10-12T23:36:14+5:302014-10-12T23:36:14+5:30

महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या मार्गदर्शनात बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीतर्फे ऐच्छिक रक्तदान जनजागरण मोहिम राबविण्यात येत आहे.

Youth should take initiatives in voluntary blood donation | युवकांनी ऐच्छिक रक्तदानात पुढाकार घ्यावा- धकाते

युवकांनी ऐच्छिक रक्तदानात पुढाकार घ्यावा- धकाते

गोंदिया : महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या मार्गदर्शनात बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीतर्फे ऐच्छिक रक्तदान जनजागरण मोहिम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. संजीव दोडके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राज वाघमारे, रक्तपेढी अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेक र उपस्थित होते. आतापर्यंत ८२ वेळा रेकॉर्ड ब्रेक ऐच्दिक रक्तदान करणारे प्रेमनारायण मुंदडा सत्कारमुर्ती म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात ऐच्छिक रक्तदान जनजागरण मोहिमेनिमित्त मुंदडा यांचा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धकाते यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, ट्रॅफी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. धकाते यांनी, रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे. रक्तदानामुळे रुग्णांचे प्राण वाचते म्हणून युवकांनी दर तीन महिन्यातून नियम्ीत रक्तदान करावे. तसेच युवकांनी रक्तदानाने वाढदिवस साजरा करण्याची जीवनशैली अंगिकारावी असे मत व्यक्त केले. पश्चात बाई गंगाबाई शासकीय रक्तपेढीत येऊन वाढविदसाला नियमीत रक्तदान करणारे युवक प्रमोद गुडघे, दिव्या भगत, प्रा. सविता बेदरकर, पत्रकार चंद्रकुमार बहेकार यांचा डॉ. धकाते यांच्या हस्ते प्रमाणपत्र, शुभेच्छापत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बाई गंगाबाई रक्तपेढीचे सन २०१३-१४ चे वार्षिक रक्तसंकलन ९ हजार ६०० रक्त युनीट एवढे रेकॉर्ड ब्रेक झाल्याने रक्तपेढी तंत्रज्ञ नेहा जैतवार, मंगेश सोनुलकर व ठाकूर यांचाही डॉ. धकाते व डॉ. दोडके यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन रक्तपेढी अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी केले. आभार नेहा जैतवार यांनी मानले. कार्यक्रमाला शहरातील माहेश्वरी समाजाचे प्रतिष्ठित नागरिक, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी, ऐच्छिक रक्तदाते व रुग्णांचे नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: Youth should take initiatives in voluntary blood donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.