समाजाच्या विकासासाठी युवकांनी पुढे यावे
By Admin | Updated: November 6, 2016 01:02 IST2016-11-06T01:02:05+5:302016-11-06T01:02:05+5:30
गुजराती राष्ट्रीय केलवनी मंडळ व गोंदिया गुजराती समाज यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी स्रेहमिलन कार्यक्रम

समाजाच्या विकासासाठी युवकांनी पुढे यावे
प्रफुल्ल पटेल : गुजराती समाजाचा दिवाळी स्रेहमिलन
गोंदिया : गुजराती राष्ट्रीय केलवनी मंडळ व गोंदिया गुजराती समाज यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी स्रेहमिलन कार्यक्रम आनंद पुरूषोत्तम वसंत गुजराती बालक मंदिर येथील सभाभवनात पार पडले. याप्रसंगी समाजबांधवांना मार्गदर्शन करताना समाजाच्या विकासासाठी युवा वर्गाने पुढे येण्याची गरज आहे. तसेच समाजासाठी समाजवाडीचे पुनर्बांधकाम केले जाईल, असे खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले.
या वेळी विद्यार्थी व शिक्षिकांनी भजन सादर करून वातावरण भक्तीमय बनविले. पंडित चंद्रकांत व्यास यांच्या आशीर्वचनाने नवीन वर्षाच्या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. सकाळी कार्यकारिणी समिती व ट्रस्ट बोर्डचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल व सचिव हरिहरभाई पटेल यांनी सर्वांना दिवाळी व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रामुख्याने अरविंद पटेल, दीपम पटेल, विजय शेठ, हिम्मत राठोड, डॉ. संघाणी, सुरेश पारेख, हसमुख पटेल, दिनेश ई. पटेल, मुकेश पटेल, दिनेश ज. पटेल, वृजलाल चावडा, निलेश पटेल, दीपक पटेल, प्रकाश काथराणी, प्रफुल्ल चावडा, जयंतीलाल परमार तसेच युवा सदस्यांमध्ये प्रजय पटेल, जयदीप पटेल, प्रशांत वडेरा, यतीन परमार, तिमीर पटेल, पिनल पटेल, इंद्रेश निर्मल, विनय पटेल, विशाल चंदाराणा आदी उपस्थित होते. या वेळी केलेल्या दुधाच्या व्यवस्थेत चिराग पटेल यांचे विशेष योगदान होते.
कार्यक्रमाचे संचालन गुजराती राष्ट्रीय केलवनी मंडळाचे सचिव जयेश पटेल यांनी केले. या वेळी समाजाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सहसचिव सुधीर राठोड यांनी मानले.
यानंतर महिलांचे कार्यक्रम झाले. याप्रसंगी वर्षा पटेल यांनी आपले सासरे स्व. मनोहरभाई पटेल यांच्या कार्यांचा उल्लेख करीत प्रफुल्ल पटेल यांच्याद्वारे गुजरातमधील विविध जिल्ह्यात केलेल्या कार्यांचा उल्लेख केला. समाजाची एकता व संघटन यावर त्यांनी भर दिला. या वेळी पूजा शाह, अर्पिता चंदाराणा, मीरा वडेरा, प्रीती पटेल, श्वेता वडेरा यांनी सभेला संबोधित केले. संचालन व आभार किंजल मेहता यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने गुजराती समाजातील महिला उपस्थित होत्या.(प्रतिनिधी)