युवकांनो, खेळासह समाजात विचारांची पेरणी करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:49 IST2021-02-05T07:49:16+5:302021-02-05T07:49:16+5:30

बाराभाटी : सर्वत्र गावापासून तर राष्ट्रीयस्तरावर सध्या क्रिकेटचे नाव उज्ज्वल आहे. पण खरी गरज तर समाजाला खेळासह विचारांची आहे. ...

Young people, sow ideas in society with sports () | युवकांनो, खेळासह समाजात विचारांची पेरणी करा ()

युवकांनो, खेळासह समाजात विचारांची पेरणी करा ()

बाराभाटी : सर्वत्र गावापासून तर राष्ट्रीयस्तरावर सध्या क्रिकेटचे नाव उज्ज्वल आहे. पण खरी गरज तर समाजाला खेळासह विचारांची आहे. हे काम आताच्या युवा पिढीने करायला हवे, तरच समाज पोषक होईल. करिता खेळासह समाजात विचारांची पेरणी करा, असे प्रतिपादन राष्ट्रीय संविधान सेनेचे दिलवर रामटेके यांनी केले.

ग्राम खांबी येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी भागवत नाकाडे, मुन्नाभाई नंदागवळी, अनुसूचित जाती काँग्रेस तालुका उपाध्यक्ष प्रितम रामटेके, प्रमोद डोंगरे, नंदेश्वर रामटेके, मदन रामटेके, प्रकाश शिवणकर, नेमीचंद मेश्राम, भागवत मेंढे, हेमराज शेंडे, रेविचंद फुंडे, वीरेंद्र डोगरे, सुनील खोटेले उपस्थित होते. स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज व घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांचे पूजन करून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. संचालन शैलेंद्र बोरकर यांनी केले. आभार जितेंद्र बोरकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी रतन लोणारे, मयूर लोणारे, विशाल रामटेके, तुषार रामटेके, निशांत रामटेके, नागेश लोणारे, सौरभ लोणारे, प्रतिश शेंडे, चुन्नीलाल नेवारे यांनी सहकार्य केले.

Web Title: Young people, sow ideas in society with sports ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.