तरुणांनी खेळासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करावे ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:31 IST2021-02-09T04:31:47+5:302021-02-09T04:31:47+5:30
बाराभाटी : धकाधकीच्या वर्तमान युगात शिक्षित तरुणांनी खेळाच्या क्षेत्राबरोबरच नानाविध क्षेत्रात आपले पाऊल उमटवण्याची गरज आहे. तरच आजचे तरुण ...

तरुणांनी खेळासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करावे ()
बाराभाटी : धकाधकीच्या वर्तमान युगात शिक्षित तरुणांनी खेळाच्या क्षेत्राबरोबरच नानाविध क्षेत्रात आपले पाऊल उमटवण्याची गरज आहे. तरच आजचे तरुण समोर भवितव्य घडवू शकतील. म्हणून विविध क्षेत्रात आता उतरणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कंत्राटदार होमराज पुस्तोडे यांनी केले.
डोंगरगाव येथे सेवन साईड रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य पतीराम मेश्राम, तामदेव कापगते, मुन्नाभाई नंदागवळी, सामाजिक कार्यकर्ते, प्रभाकर दहीकर, ग्रा.पं.सदस्य धम्मदीप मेश्राम, माजी सदस्य संजय पाटील संग्रामे, अभिजीत कापगते, आशिष लंजे, सुदाम येडाम उपस्थित होते. सामने डोंगरगाव बी.सी.सी. क्रिकेट मंडळाेने आयोजित केले आहेत.
उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक मिथुन मेश्राम यांनी करून संचालन व आभार राजू येडाम यांनी मानले. यशस्वीतेसाठी अरविंद इस्कापे, रोहित गेडाम, विजय कांबळे, उमेश कांबळे, नागेश्वर औरासे, रवी औरासे, राहुल औरासे यांनी सहकार्य केले.