तरुण उमेदवाराने केली अनुभवी सदस्यावर मात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:29 IST2021-01-20T04:29:58+5:302021-01-20T04:29:58+5:30

कुलदीप पटले (रा. गर्रा) असे निवडून आलेल्या २३ वर्षीय तरुण सदस्याचे नाव आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा कुठलाही अनुभव पाठीशी नसताना ...

Young Candidate Overcomes Experienced Member () | तरुण उमेदवाराने केली अनुभवी सदस्यावर मात ()

तरुण उमेदवाराने केली अनुभवी सदस्यावर मात ()

कुलदीप पटले (रा. गर्रा) असे निवडून आलेल्या २३ वर्षीय तरुण सदस्याचे नाव आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा कुठलाही अनुभव पाठीशी नसताना कुलदीपने गावकरी आणि मित्रांच्या आग्रहाखातर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. यानंतर सोमवारी ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला. त्यात कुलदीपने आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा ५० मतांनी पराभव केला. कुलदीपला २८९ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी उमेदवाराला २२९ मते मिळाली. गर्रा ग्रामपंचायतीत तो सर्वात तरुण सदस्य असून, तालुक्यातूनसुध्दा सर्वात कमी वय असलेला सदस्य असल्याचे बोलले जाते. गावकऱ्यांनी आपल्यावर व्यक्त केलेल्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. तसेच मिळालेल्या संधीचा गावाच्या विकासासाठी उपयोग करणार असल्याचे कुलदीप पटले यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा प्रथमच तरुण उमेदवारांना मतदारांनीसुध्दा कौल दिल्याचे चित्र आहे.

Web Title: Young Candidate Overcomes Experienced Member ()