शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

धबधबा पाहायला चाललास मित्रा! पण, जरा जपून जा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 5:00 AM

गोंदिया जिल्ह्यात वैनगंगा, वाघ नदी, गाढवी नदी, पांगोली नदी तसेच इतर सहायक नद्या व नाल्यांना पूर आला असून, पूर बघण्यासाठी लोक नदी काठावर जात असतात. काठावर जाऊन पाण्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. परंतु सतत पडलेल्या पावसामुळे नदीकाठावरील जागा पानथळ झालेली असून, नदी काठावरची माती सतत कोसळत असते. अशात अगदी वाहत्या पाण्याजवळ गेल्यास पाय घसरल्याशिवाय राहत नाही; परिणामी जीव जातो.

विजय मानकर लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस येत असून, या पावसामुळे सर्वत्र नदी-नाले ओसंडून वाहून लागले आहेत. तसेच अनेक नदी-नाल्यांना पूरसुद्धा आला आहे. त्यावर रानावनात, दगडांतून झरे व धबधबेसुद्धा पाण्यातून कर्णमधुर संगीत निर्माण करीत आहेत. सालेकसा तालुक्याचा सुप्रसिद्ध हाजराफाॅल धबधबा लोकांना भुरळ घालत आहे. युवक-युवती हाजराफाॅल धबधब्याचा आनंद घ्यायला येऊ लागले आहेत. गोंदिया जिल्ह्यात वैनगंगा, वाघ नदी, गाढवी नदी, पांगोली नदी तसेच इतर सहायक नद्या व नाल्यांना पूर आला असून, पूर बघण्यासाठी लोक नदी काठावर जात असतात. काठावर जाऊन पाण्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. परंतु सतत पडलेल्या पावसामुळे नदीकाठावरील जागा पानथळ झालेली असून, नदी काठावरची माती सतत कोसळत असते. अशात अगदी वाहत्या पाण्याजवळ गेल्यास पाय घसरल्याशिवाय राहत नाही; परिणामी जीव जातो. म्हणून पुराच्या पाण्यापासून पुरेशा अंतरावर राहून पाहणे हितकारक ठरेल. सालेकसा तालुक्यातील हाजराफाॅल धबधबा, देवरी तालुक्याचा ढासगड धबधबा पर्यटकांना आकर्षित करू लागला आहे. परंतु पाण्याचे आकर्षण वाढताच लोक जवळ जाऊन वेगाने पडणाऱ्या किंवा वाहणाऱ्या पाण्यासोबत खेळू लागतात, अशात तोल जाऊन धोका निर्माण होताे. देवरी सालेकसा तालुक्यातील सिरपूर, पुजारीटोला, कालीसरार धरण, तिरोडा तालुक्यातील खरबंदा, बोदलकसा जलाशय किंवा जिल्ह्यातील इतर छोटी-मोठी जलाशये तुडुंब भरलेली असून काही जलाशयांतून पाण्याचा विसर्गसुद्धा होत आहे. अशा ठिकाणी तरुण-तरुणी जवळ जाऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात. परंतु सेल्फीच्या नादात तोल जाऊन धोका होतो. नवेगावबांध येथील जलाशयात लोक नौकाविहार करण्याचा हेतूने येतात. परंतु पावसाळ्यात नौकाविहार करणे खूपच जास्त धोक्याचे असते. बोट उलटून लोक बुडत असल्याचा सतत घटना घडत आहेत. तरीसुद्धा लोक दक्षता बाळगताना दिसत नाहीत. 

आतापर्यंत अनेकांचे बळी- मागील सहा सात वर्षात हाजराफाॅलमध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समितीची देखरेख वाढली असून येथील नवयुवक ठिकठिकाणी नजर ठेवून असतात. त्यामुळे येथे अपघात कमी झाले. परंतु त्या आधी दोन दशकात अनेक तरुणांना आपले जीव गमवावे लागले. तेही पहाडीवरुन तलावात पडून बुडाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

पाण्याशी खेळ नकोच !- पावसाळ्यात जलाशयात खूप वाहत पाणी असून अशात बोटीवर फिरत असताना काही जण बोटीच्या एकाच बाजूवर जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतात. अशात बरेचदा नाव उलटत असते. काहींना बोटीवर उभे राहून सेल्फी काढण्याचा मोठा नाद असतो, परंतु हा मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतो. म्हणून बोटीवर सेल्फी आणि पाण्याशी खेळ नकोच.

धोका पत्करू नका - पर्यटकांनी पहाडावर किंवा मोठ्या दगडावर चढूृ नये, शिवाय पहाडावरुन सतत पाणी पाझरत असून चढता उतरता मोठा धोकादायक असते. काही लोक झाडाच्या फांद्या पकडून वर चढण्याचा प्रयत्न करतात. परंतु पावसाळ्यात झाडाचे बुड कमजोर झालेले असतात तसेच फांद्यावरुन हात घसरतो आणि अपघात झाल्यास खाली पाण्यात पडण्याची भीती असते. 

मागील काही दिवसापासून सतत पाऊस पडत असून नदी नाल्यांची पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे हाजराफाॅलला पाण्याची पातळी वाढली असून तलावात सुध्दा पाणी वाढले असून प्रवाहाचा वेग सुध्दा वाढला आहे. अशात पर्यटकांनी सेल्फी काढण्यासाठी जवळ जाऊ नये तसेच पहाडावर अजिबात चढू नये. -अभिजित इलमकर, वनपरिक्षेत्राधिकारी सालेकसा.

 

टॅग्स :tourismपर्यटन