यावर्षीही बैलपोळ्यावर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:29 IST2021-09-11T04:29:01+5:302021-09-11T04:29:01+5:30

केशोरी : जिल्ह्यात बैलपोळा व तान्हा पोळा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे; मात्र शासनाने ...

This year too, the corona has hit the bullpen | यावर्षीही बैलपोळ्यावर कोरोनाचे सावट

यावर्षीही बैलपोळ्यावर कोरोनाचे सावट

केशोरी : जिल्ह्यात बैलपोळा व तान्हा पोळा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे; मात्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सुद्धा बैलपोळा घरच्या घरीच राहून साध्यापद्धतीने साजरा करावा लागल्याने बैलपोळ्यावर कोरोनाचे सावट दिसून आले.

प्राणी मात्रावर दया करा असा शुभ संदेश देणारा पोळा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे; मात्र सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचे निर्बंध पाळत वर्षभर शेतात राबराब राबणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा पोळा साधेपणानेच साजरा करावा लागला. बैलाच्या श्रृंगारासाठी शेतकरी ८ दिवसांपूर्वीपासून नियोजन करीत असतात; मात्र यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. बऱ्याच गावामध्ये बैल पोळ्याचा फारसा उत्साह दिसून आला नाही. बदलत्या काळानुसार शेतातील कामे यंत्राच्या सहायाने केली जात असली तरीही पोळ्याचा आनंद शेतकऱ्यांना वेगळाच होतो. शेतकऱ्यांच्या सतत मदतीला असणारी बैलजोडी प्राणप्रिय असते. यासाठी शेतकरी पोळा निमित्ताने बैलांना साजश्रृंगार करून त्यांच्याबद्दल पोळ्यातून कृतज्ञता करीत असतो; मात्र कोरोनाचे सावट असल्याने निर्बंध पोळा सणावर घालण्यात आले आहेत. त्यामुळे पोळा हा सण साधेपणाने साजरा करावा लागला. सलग दुसऱ्या वर्षी पोळा सणावर कोरोनाचे सावट असल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले.

Web Title: This year too, the corona has hit the bullpen