यंदा आढळले २३१ हिवतापाचे रूण
By Admin | Updated: April 28, 2016 01:38 IST2016-04-28T01:38:09+5:302016-04-28T01:38:09+5:30
जिल्ह्यातील मागील तीन वर्षाची आकडेवारी पाहता सन २१४ मध्ये १४६५ हिवतापाचे रुग्ण, सन २०१५ मध्ये हिवतापाचे १४१५ रुग्ण आढळून आले.

यंदा आढळले २३१ हिवतापाचे रूण
हिवताप दिन : सलील पाटील यांची माहिती
गोंदिया : जिल्ह्यातील मागील तीन वर्षाची आकडेवारी पाहता सन २१४ मध्ये १४६५ हिवतापाचे रुग्ण, सन २०१५ मध्ये हिवतापाचे १४१५ रुग्ण आढळून आले. जानेवारी २०१६ ते आजपर्यंत २३१ रुग्ण आढळून आले. यावरुन गोंदिया जिल्हा हा हिवतापासाठी संवेदनशील असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.सलील पाटील यांनी दिली. हिवताप दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रास्ताविकातून त्यांनी ही माहिती दिली.
अतिसंवेदनशील समजण्यात येणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात हिवताप या आजारावर नियंत्रण मिळविण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना जनतेच्या सहकार्यामुळे यश प्राप्त झाले आहे. या जिवघेण्या आजारावर संपूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी यापुढेही सहकार्याची नितांत गरज आहे, असे मत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवि धकाते यांनी व्यक्त केले.
जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या वतीने २५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन केटीएस नर्सींग स्कूल बीजीडब्ल्यू स्त्री रु ग्णालय येथे साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ.धकाते बोलत होते. उदघाटक म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरीश कळमकर, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद वाघमारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजीव दोडके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.सलील पाटील, डॉ.अमरीश मोहबे व रक्त संक्रमण अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर उपस्थित होते. मान्यवरांनी हिवतापाकरीता कारणीभूत असलेले नाफेलीस या डासाचे व रोगजंतूच्या शोधाचे जनक डॉ.सर रोनाल्ड रॉस यांच्या छायाचित्राला मार्ल्यापण व दीप प्रज्वलन केले. यावेळी सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गहलोत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद वाघमारे, डॉ.मोहबे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.दोडके व रक्त संक्रमण अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर यांनी हिवताप या आजाराच्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक कारवाई बाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.सलील पाटील यांनी केले.
जिल्ह्यात हिवताप वाढीची कारणे पाहता जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणात असल्याने साचलेल्या पाण्यात डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. जनतेमध्ये डासापासून संरक्षण व तत्काळ उपचार घेण्यासाठी जागृतता निर्माण होण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करुन या आजाराचे नायनाट होण्याचे दृष्टीने जनजागृती करणे हे जागतिक हिवताप दिवसाचे महत्व असल्याचे कार्यशाळेत उपस्थित नर्सींग शाळेच्या प्रशिक्षणार्थी व कर्मचारी, अधिकाऱ्यांना पटवून देण्यात आले.
संचालन व आभार किशोर भालेराव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केटीएस नर्सींग शाळेचे सहायक प्राचार्य श्रीमती शहारे, सहयोगी मॉर्टीन, निकिता दमके, ज्योती सदन व बजाज नर्सींग शाळेचे प्राचार्य तसेच सहायक जिल्हा हिवताप अधिकारी बिंझाडे, आरोग्य सहायक पराते व किटक समाहारक मुनेश्वर यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)