‘इंटेग्रिटी रन-१६’ मध्ये यादव द्वितीय
By Admin | Updated: February 7, 2016 02:35 IST2016-02-07T02:35:03+5:302016-02-07T02:35:03+5:30
कंटोनमेंट बोर्ड कामठी येथे ‘इंटेग्रिटी रन-१६’ या नावाने आयोजित दौड स्पर्धेत पाच किलोमीटर दौडमध्ये ६१ वर्षे

‘इंटेग्रिटी रन-१६’ मध्ये यादव द्वितीय
गोंदिया : कंटोनमेंट बोर्ड कामठी येथे ‘इंटेग्रिटी रन-१६’ या नावाने आयोजित दौड स्पर्धेत पाच किलोमीटर दौडमध्ये ६१ वर्षे वयोगटात येथील ७२ वर्षीय धावक मुन्नायाल यादव यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. त्यांना ब्रिजमोहन मल्होत्रा पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.
विशेष असे की, यादव यांनी या आधीही देशात अनेक ठिकाणी आयोजित मेराथॉन व दौड स्पर्धेत पुरस्कार पटकाविले आहेत. त्यांना विदेशातील स्पर्धेत धावण्याची संधी मिळाली. मात्र आर्थिक समस्येमुळे ते कधीही जाऊ शकले नाही.
या वयातही ते नियमित धावतात व युवकांना प्रेरित करतात. ते युवकांना नि:शुल्क मार्गदर्शन करुन शहरातून चांगले धावक तयार व्हावे याचा प्रयत्न निरंतर करीत आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल जयंत शुक्ला, डॉ. राजेंद्र जैन, पुष्पक जसानी, डॉ. पुरोहित, डॉ. शिबू आचार्य, प्रकाश जसानी, राजन चौबे, दीपक जोशी, अरमान भिगे, मोहन पवार, अनिल मदनकर, नामदेव रहिले, सचिव चौधरी, पंकज सोनवाने, विनोद बन्सोडे, अहमद मनियार, मिदुप श्रीवास्तव, शैलेश ढाले, धनंजय रिनायत आदींनी कौतूक केले आहे. (शहर प्रतिनिधी)