वुशू क्रीडा स्पर्धेचे प्रशिक्षण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:33 IST2021-09-06T04:33:54+5:302021-09-06T04:33:54+5:30

याप्रसंगी डॉ.हेमंत बक्षी, आशिष ठकरानी, हेमलता पटेल, नगरसेवक लोकेश यादव, शशिकुमार फतेह यांच्या हस्ते राष्ट्रीय खेळाडू निशा पांडे, रूपेश ...

Wushu Sports Competition Training Camp | वुशू क्रीडा स्पर्धेचे प्रशिक्षण शिबिर

वुशू क्रीडा स्पर्धेचे प्रशिक्षण शिबिर

याप्रसंगी डॉ.हेमंत बक्षी, आशिष ठकरानी, हेमलता पटेल, नगरसेवक लोकेश यादव, शशिकुमार फतेह यांच्या हस्ते राष्ट्रीय खेळाडू निशा पांडे, रूपेश साखरे, सोहेल डोये यांचा सत्कार करण्यात आला. सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शिबिरासाठी नरेश श्रीपात्री, खुशाल पिंजारघरे, चंद्रशेखर बोहने, ममता गायधने, राहुल रहांगडाले, अमन नदेश्वर, प्रीत नागपुरे यांनी सहकार्य केले.

कीडरोगांवर उपचार करण्याचा दिला सल्ला

देवरी : मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कन्हाळगाव (देवरी) येथे शेतकऱ्यांना फळबागेत कोणते खत वापरावे आणि रोगांवर नियंत्रण कसे करता येईल, यावर मार्गदर्शन केले. या दरम्यान डिम्पल बहेकार आणि श्रेया कटकवार यांनी कन्हाळगाव येथील शेतकरी भूमेश्वर रहांगडाले यांच्या शेतात भेट देऊन फळबागेत खताचे नियोजन व रोगांवर कसे उपचार करता येईल, याबद्दल माहिती दिली. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एन.बडवाईक, पी.एस.चोपकर, विषयतज्ज्ञ आर.आर.कोवे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम घेण्यात आला.

Web Title: Wushu Sports Competition Training Camp