जागतिक कॅन्सर जनजागरण सप्ताह ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:31 IST2021-02-09T04:31:38+5:302021-02-09T04:31:38+5:30

याप्रसंगी एनसीडी समन्वयक डॉ. स्नेहा वंजारी, आरएमओ डॉ. सुवर्णा हुबेकर, डॉ. अनिल आटे, आयटी समन्वयक मनीष मदने उपस्थित होते. ...

World Cancer Awareness Week () | जागतिक कॅन्सर जनजागरण सप्ताह ()

जागतिक कॅन्सर जनजागरण सप्ताह ()

याप्रसंगी एनसीडी समन्वयक डॉ. स्नेहा वंजारी, आरएमओ डॉ. सुवर्णा हुबेकर, डॉ. अनिल आटे, आयटी समन्वयक मनीष मदने उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. अमरीश मोहबे यांनी आवाहन केले की, कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी महात्मा जाेतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना गोंदिया शहरातील नामांकित खासगी अंगीकृत रुग्णालयात कॅशलेस स्वरूपात उपलब्ध आहे त्यांचा लाभ घ्यावा. केटीएस जिल्हा रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी आवाहन केले. चाळिशीतील महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी, स्तनाचा कर्करोग लवकर निदान व्हावे म्हणून मॅमोग्राफी करून घ्यावी व गर्भाशय मुखाचा कर्करोग स्क्रीनिंगसाठी नियमित पॅप्स स्केअर तपासणी करून घ्यावी. गोंदिया शहरातील अर्बन एएनएम यांना एनसीडी रुग्णांची डिजिटल नोंदणी करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे मोफत टॅब वितरित केले आहेत. त्यांनी दैनंदिन लॉग इन करून असंसर्गजन्य आजार पीडित रुग्णांची नोंदणी करावी. गोंदिया जिल्ह्यात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण ग्रामीण भागातसुद्धा आढळून येत आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने आरोग्यवर्धिनी केंद्रातून सीएचओमार्फत आरोग्यसेविका यांना स्क्रीनिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे आता संशयित कॅन्सर रुग्णांना थेट तपासणीसाठी गोंदिया मुख्यालयाला धाव घेण्याचीच गरज नाही, अशी माहिती एनसीडी समन्वयिका डॉ. स्नेहा वंजारी यांनी याप्रसंगी दिली. जागतिक कॅन्सर जनजागरण सप्ताहनिमित्त गोंदिया जिल्ह्यात प्रत्येक तालुका पातळीवर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकाच्या समन्वयाने मोफत मुख दंत कॅन्सर स्क्रीनिंग व निदान उपचार शिबिरे आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ.अनिल आटे यांनी सांगितली.

Web Title: World Cancer Awareness Week ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.