अजाज अत्याचार प्रतिबंध कायद्यावर रंगणार कार्यशाळा
By Admin | Updated: February 23, 2015 02:04 IST2015-02-23T02:04:13+5:302015-02-23T02:04:13+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यावतीने २५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सकाळी १०.३० वाजता ..

अजाज अत्याचार प्रतिबंध कायद्यावर रंगणार कार्यशाळा
गोंदिया : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यावतीने २५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सकाळी १०.३० वाजता अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १०.३० वाजता राज्याचे समाजकल्याण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडाले कार्यशाळेचे उद्घाटन करतील. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलिस अधीक्षक शशीकुमार मीना, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेचे निबंधक व प्रकल्प संचालक राजेंद्र मुठे, समाजकल्याण सहायक आयुक्त सुरेश पेंदाम, प्रकल्प अधिकारी व कार्यशाळा समन्वयक मनोज खंडारे उपस्थित राहणार आहे.
कार्यशाळेत प्रसिद्ध विचारवंत व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुण्याच्या महात्मा फुले अध्यासन केंद्राचे विभागप्रमुख हरी नरके हे महाराष्ट्रातील जातीप्रथा, समस्या आणि सामाजिक वास्तव या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
दुपारच्या सत्रात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९७९ मधील तरतूदी व विश्लेषण आणि मानवी हक्क अंमलबजावणी व प्रशासनाची भूमिका या विषयावर अॅड. विनोदकुमार गजभिये, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ या कायद्याची आवश्यकता व त्याची प्रभावी अंमलबजावणी या विषयावर अॅड. राजेंद्र पांडे आणि सेवानिवृत्त अपर पोलीस महासंचालक अशोक धीवरे हे मार्गदर्शन करणार आहे.
कार्यशाळेला जिल्ह्यातील सामाजिक न्याय क्षेतात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, विधी आणि समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तिंना प्रशिक्षणार्थी म्हणून आमंत्रित केले आहे. अधिक संख्येत नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)