कोविड चाचणीनंतरच मजुरांना राहोयोच्या कामावर घेतले ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:30 IST2021-03-27T04:30:31+5:302021-03-27T04:30:31+5:30
गोंदिया : तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या खमारी येथील मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून ग्रामपंचायत मार्फत रोजगार हमी योजनेच्या ...

कोविड चाचणीनंतरच मजुरांना राहोयोच्या कामावर घेतले ()
गोंदिया : तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या खमारी येथील मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून ग्रामपंचायत मार्फत रोजगार हमी योजनेच्या कामाला सुरूवात करण्यात आली. परंतु या कामाला सुरूवात करण्याच्या दोन दिवसाअगोदर आरोग्य विभागामार्फत कोविड-१९ ची चाचणी करविण्यात आली. ज्या मजुरांचा अहवाल नकारात्मक आला अशा १८० मजुरांना कामावर घेण्यात आले.
खमारी येथे रस्ता बांधकाम रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. ह्या कामाला सुरूवात करण्याच्या अगोदर वैद्यकीय यंत्रणेच्या माध्यामातून २०० मजुरांची कोविड चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर १८० मजुरांना रोजगार हमी योजनेच्या कामावर घेण्यात आले. सरपंच होमेंद्र भांडारकर, उपसरपंच लीला उके, ग्रामविकास अधिकारी एस.जे. बागडकर यांच्या हस्ते या कामाचे भूमीपूजन करून कामला सुरूवात करण्यात आली. योवळी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीकांत अग्रवाल, अकलेश धोटे, अनिता भुते, सरस्वता मेश्राम, किरण बारापात्रे, मनोहर साखरे, क्रांती कुंभरे, अश्वीनी गायधने, अनिता मुनेश्वर, रंजीत गायधने, परदेश कावळे, डिलेश्वर किरणापुरे, सुभाष तरोणे, गीता उके व सुशीला भांडारकर उपिस्थत होत्या. सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या हस्ते कुदळ मारून भूमीपूजन करण्यात आले. मजुरांना रोजगार मिळावा म्हणून रोहयोच्या कामाला सुरूवात करण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी एस.जे.बागळकर यांनी दिली.