कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद विसरून जोमाने कामाला लागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:25 IST2021-02-08T04:25:31+5:302021-02-08T04:25:31+5:30
सौंदड : येणारा काळ हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. यामुळे आता कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद विसरून जोमाने कामाला लागावे, असे प्रतिपादन ...

कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद विसरून जोमाने कामाला लागा
सौंदड : येणारा काळ हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. यामुळे आता कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद विसरून जोमाने कामाला लागावे, असे प्रतिपादन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने ग्राम कोसमतोंडी येथील शुक्रवारी (दि. ५) आयोजित क्षेत्रनिहाय कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. माजी मंत्री बडोले यांच्या सुचनेनुसार व तालुकाध्यक्ष अशोक लंजे आणि पांढरी जिल्हा परिषदेचे प्रभारी लक्ष्मीकांत धनगाये यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मेळाव्याला लक्ष्मीकांत धनगाये, शेषराव गिऱ्हेपुंजे, अनुसूचित जाती अध्यक्ष जे. डी. जगणीत, देवराम रहांगडाले, डॉ. बबन कांबळे, गिरीधारी हत्तीमारे, विश्वनाथ राहांगडाले, मनोहर काशिवार, चेतन वडगाये प्रामुख्याने उपस्थित होते.
पंडित दिनदयाळ उपाध्यय व डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या छायाचित्रांचे माजी मंत्री बडोले यांच्या हस्ते पूजन व माल्यार्पण करून मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. राज्यातील महाविकास आघाडीचे शासन शेतकरी हिताचे नसून दलालांचे शासन आहे. या शासनाने कोविड-१९ संक्रमण काळातील वीज बिल माफ करण्यात येईल, असा डांगोरा पिटला होता. पण वीजबिल माफी तर सोडा, आता शासन वीज कनेक्शन तोडण्याच्या तयारीत आहे. फडणवीस सरकारमध्ये शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे एका एकरावर १६ क्विंटल धान खरेदी केले जात होते. पण या आघाडी शासनाने १६ क्विंटलवरून एकरी १३ क्विंटलवर आणले. आघाडी शासन शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे नसून त्यांना लुबाडणारे शासन आहे, अशी टीका बडोले यांनी केली.
दरम्यान, पक्षातील ज्येष्ठ सदस्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच भाजपात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचासुद्धा पक्षाचा दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला. संचालन भाजयुमोचे जिल्हा संचालक गौरेश बावनकर यांनी केले. प्रास्ताविक जगदीश काशिवार यांनी केले. मेळाव्यासाठी भाजयुमो तालुकाध्यक्ष विलास बागडकर, शिशिर येळे, महेंद्र टेंभरे, विजय बावनकर, किशोर मळकाम, प्रकाश काशिवार, अनिल गजभिये, माणिक चौधरी, प्रमोद खोब्रागडे, किशोर खोब्रागडे, मनोहर बावने, रामचंद्र काशिवार यांच्यासह पांढरी जिल्हा परिषद क्षेत्रातील बुथ प्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुखांनी सहकार्य केले. मेळाव्याला क्षेत्रातील शक्तीकेंद्र, बुथ प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.