कार्यकर्त्यांनो, जोमाने कामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 22:06 IST2017-09-25T22:05:58+5:302017-09-25T22:06:13+5:30
भाजपाचे सरकार खोटारडे आहे. सामान्य जनता, शेतकरी, व्यापारी व युवकांचे सरकारद्वारे नवनवीन कायदे तयार करुन शोषण केले जात आहे.

कार्यकर्त्यांनो, जोमाने कामे करा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भाजपाचे सरकार खोटारडे आहे. सामान्य जनता, शेतकरी, व्यापारी व युवकांचे सरकारद्वारे नवनवीन कायदे तयार करुन शोषण केले जात आहे. या खोटारड्या सरकारला धडा शिकविण्यासाठी गाव पातळीवरुन कार्यकर्त्यांनी समोर येणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे, असे आवाहन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
जिल्हा राष्टÑवादी काँग्रेसच्यावतीने बैठक घेण्यात आली. या वेळी ते राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते.
खासदार पटेल पुढे म्हणाले, मन की बात आता संपली आहे. पंतप्रधानांच्या भाषणाला जनता कंटाळली आहे. नोटबंदी व जीएसटीचे दुष्परिणाम सामान्य जनता भोगत आहे. सध्याचे सरकार हे देशात आर्थिक संकट निर्माण करीत आहे. विरोधक माझ्याविषयी अपप्रचार करुन कार्यकर्त्यांचे मनोबल कमी करीत आहेत. तेव्हा कार्यकर्त्यांनी खचून जावू नये. येथून निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणून ते कार्य करीत आहेत. पण सामान्य जनतेची कामे किती करीत आहेत, हे आता सर्वांना दिसून येत आहे. मी नेहमीच भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील जनतेसाठी काम काम करीत राहणार असल्याचे सांगितले.
जिल्ह्यात होवू घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यानी एकदिलाने काम करुन भाजप सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचे आवाहन ना.पटेल यांनी केले. या वेळी तालुकाध्यक्ष व पदाधिकाºयांनी त्यांच्या मार्गदर्शनात सर्व कार्यकर्त्यांनी गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचून त्यांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी भाजप व काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्टÑवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष विनोद हरिणखेडे यांनी केले. आभार शहर अध्यक्ष अशोक शहारे यांनी मानले. बैठकीत प्रामुख्याने माजी आ. राजेंद्र जैन, माजी आ. दिलीप बन्सोड, विजय शिवणकर, राजलक्ष्मी तुरकर, अशोक शहारे, देवेंद्रनाथ चौबे, अशोक गुप्ता, मनोहर चंद्रिकापुरे, रमेश ताराम, महेश जैन, गंगाधर परशुरामकर, कुंदन कटारे, छोटू पटले, दामोदर अग्रवाल, हिरालाल चव्हाण, केतन तुरकर, किशोर तरोणे, नामदेव डोंगरवार, शिव शर्मा, कमल बहेकार, पंचम बिसेन, के.बी. चव्हाण, प्रेम रहांगडाले, जिब्राईल पठान, डॉ. अविनाश काशिवार, केवल बघेले, डॉ. अविनाश जायस्वाल उपस्थित होते.