दुसऱ्याचे जीवन फुलविणारे महादानाचे कार्य घडावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 21:39 IST2019-07-03T21:39:27+5:302019-07-03T21:39:45+5:30
दानात दान महादान म्हणजे रक्तदानाचे कार्य होय. आपल्या रक्तदानाने मृत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीचे जीवन फुलते. या दानापेक्षा दुसरे मोठे दान नाही. लोकमततर्फे विविध सामाजिक कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. त्यातच रक्तदान शिबिराचे आयोजन करणे हा एक स्तुत्य उपक्रम असून प्रत्येकाच्या हातून या महादानचे कार्य घडावे, असे उद्गार डॉ. नितीन दवंडे यांनी काढले.

दुसऱ्याचे जीवन फुलविणारे महादानाचे कार्य घडावे
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दानात दान महादान म्हणजे रक्तदानाचे कार्य होय. आपल्या रक्तदानाने मृत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीचे जीवन फुलते. या दानापेक्षा दुसरे मोठे दान नाही. लोकमततर्फे विविध सामाजिक कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. त्यातच रक्तदान शिबिराचे आयोजन करणे हा एक स्तुत्य उपक्रम असून प्रत्येकाच्या हातून या महादानचे कार्य घडावे, असे उद्गार डॉ. नितीन दवंडे यांनी काढले.
लोकमत वृत्तपत्रसमूह व डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी शहरातील सुभाष बागेतील हुतात्मा स्मारक येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. लोकमतचे संस्थापक व स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने विनायक नखाते, रत्नमाला चौधरी, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख मिलिंद वाढई, लोकमत जिल्हा प्रतिनिधी अंकुश गुंडावार, डॉ. सुवर्णा हुबेकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य (बाबूजी) यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलनाने झाली.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. नितीन दवंडे म्हणाले, लोकमत सामाजिक बांधिलकीतून अनेक उपक्रम राबवित असते. सखी मंच, बाल विकास मंच व युवा नेक्स्टच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविते. यामाध्यमातून समाजमन घडविण्याचे कार्य लोकमत करीत आहे. लोकमतचा ठसा वाचक वर्गावर असून विविध उपक्रमांतून समाजमन घडविण्याची लोकमतची तळमळ समाजात दिसून येते. या प्रसंशनिय कार्याबद्दल लोकमतची स्तुती केली.
या वेळी रक्तगट, हिमोग्लोबीन, रक्तदाब तपासणी करून रक्तदानास सक्षम असलेल्या अनेकांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले. संचालन व आभार श्रीकांत पिल्लेवार यांनी केले. या वेळी जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार, सखी मंच संयोजिका ज्योत्सना सहारे, नरेश रहिले, अतुल कडू, प्रफुल बावणे, सचिन कावळे, प्रफुल गणविर, हितेश बंसोड, मनिष मेश्राम, असलम खान, मदन मारबते, सुमित देशपांडे, शिवांशु मिश्रा, हर्षा भोंगडे, पूजा टेंभरे, रेखा कुर्वे, ललीता ताराम, प्रिया बोहरे, मीना डुंबरे, आम्रपाली वनकर, दीपा काशिवार, प्रमोद बागडे यांनी सहकार्य केले.