शिंपी संघटनेतर्फेमास्क तयार करण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 06:00 AM2020-03-30T06:00:00+5:302020-03-30T06:00:23+5:30

खबरदारी चा उपाय म्हणून मास्क हे महत्त्वपूर्ण समजले जाते. देशात आणि राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी मास्क आणि सॅनिटायझरचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनारुपी संकटाला तोंड देण्यासाठी शासन आणि प्रशासनातर्फे विविध उपाय योजना केल्या जात आहे.

Work on the mask is started by the Shimpi Association | शिंपी संघटनेतर्फेमास्क तयार करण्याचे काम सुरू

शिंपी संघटनेतर्फेमास्क तयार करण्याचे काम सुरू

Next
ठळक मुद्देमहागाव येथे मोफत मास्क वाटप करणार : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घेतला सामूहिक निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मास्कचा तुटवडा व काळाबाजार होत असल्याच्या बातम्या येत आहेत. अशातच महागाव येथील शिंपी संघटनेने पुढाकार घेत मास्क तयार करून गावात मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या देशात सर्वत्र कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. शासन व प्रशासनाकडून काळजी घेण्याचे जनतेला वारंवार आवाहन केले जात आहे. खबरदारी चा उपाय म्हणून मास्क हे महत्त्वपूर्ण समजले जाते. देशात आणि राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी मास्क आणि सॅनिटायझरचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनारुपी संकटाला तोंड देण्यासाठी शासन आणि प्रशासनातर्फे विविध उपाय योजना केल्या जात आहे. तर संकटात सापडलेल्यांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक आणि स्वंयसेवी संघटना पुढे येऊन मदत करीत आहे.
असाच पुढाकार अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव येथील शिंपी संघटनेने घेतला आहे. सध्या अनेक ठिकाणी मास्क उपलब्ध नाहीत.अशात महागाव येथील शिंपी संघटनेने सभा घेऊन गावकऱ्यांना मोफत मास्क वाटप करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. महागाव ग्रामपंचायत अंतर्गत शिंपी संघटनेच्या वतीने जि.प. प्राथमिक शाळेत मास्क तयार करण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे.
महागावच्या शिंपी संघटनेच्या या स्तुत्य उपक्र माचे तालुक्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे.यासाठी बळीराम राऊत, मनोहर जांभुळकर, दामोदर मेंढे, दिलीप जांभुळकर, भुमेश्वर जांभुळकर, पुष्पराज सोनग्रे, भागेश्वर कोल्हटकर, लालदास मेश्राम, अशोक रामटेके, विवेक जांभुळकर,हिरालाल निनावे, प्रतीक राऊत, चंद्रशेखर मडामे, अरविंद वासनिक,यादोराव मंदूरकर यांचा समावेश आहे.यात सरपंच प्रमोद लांडगे यांनी मोलाची कामगिरी बजावली.
 

Web Title: Work on the mask is started by the Shimpi Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.