पक्ष संटनेसाठी जोमाने कामाला लागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:21 IST2021-07-18T04:21:10+5:302021-07-18T04:21:10+5:30

गोरेगाव : परिस्थिती कधीही एकसारखी राहत नाही त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता पक्ष संघटनेसाठी जोमाने कामाला लागावे, असे प्रतिपादन ...

Work hard for the party | पक्ष संटनेसाठी जोमाने कामाला लागा

पक्ष संटनेसाठी जोमाने कामाला लागा

गोरेगाव : परिस्थिती कधीही एकसारखी राहत नाही त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता पक्ष संघटनेसाठी जोमाने कामाला लागावे, असे प्रतिपादन आमदार अभिजित वंजारी यांनी केले. तालुका काँग्रेस कमेटीच्यावतीने शुक्रवारी (दि.१८) शहरातील शारजा लाॅन येथे आयोजित कॉँग्रेस कार्यकर्ता मेळावा व सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डाॅ. नामदेव किरसान होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश प्रतिनिधी डाॅ. झामसिंग बघेले, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रत्नदीप दहीवले, प्रदेश सचिव विनोद जैन, जिल्हा उपाध्यक्ष सी.टी.चौधरी, प्रदेश सचिव अमर वऱ्हाडे, जिल्हा उपाध्यक्ष पी.जी. कटरे, राधेलाल पटले, ओबीसी जिल्हाध्यक्ष जितेंद्र कटरे, जिल्हा सचिव जगदीश येरोला, महिला कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष उषा शहारे, पी.सी.चव्हाण, मलेशाम येरोला, राजेंद्र राठोड, माणिक बिसेन, शशेंद्र भगत आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार दिलीप बंसोड यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. तसेच लवकरच कॉँग्रेस पक्षाची मोठी फौज निर्माण करून पक्षाच्या बळकटीसाठी सर्व जिल्हा पिंजून काढणार असे सांगितले. या कार्यक्रमात तालुका कॉँग्रेस कमिटीकडून विधान परिषदेचे आमदार वंजारी, माजी आमदार बंसोड यांचा सत्कार करण्यात आला. संचालन डाॅ. विवेक मेंढे यांनी केले. आभार तालुकाध्यक्ष डेमेंद्र रहांगडाले यांनी मानले. मेळाव्यासाठी भूमेश्वरी रहांगङाले, राहुल कटरे, खिरंचद येळे, चद्रशेखर बोपचे, डाॅ. विवेक मेंढे , रवींद्र चन्ने, नीरज धमगाये, गणराज कुंबडे, अशोक शेंडे आदिंनी सहकार्य केले.

Web Title: Work hard for the party