११२८ विहिरींचे काम अपूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 21:25 IST2018-04-09T21:25:23+5:302018-04-09T21:25:23+5:30
दुष्काळावर मात करण्यासाठी व शेतकऱ्यांना सिंचनाची सोय करता यावी यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना सुरू करण्यात आली. तरीही भूगर्भातील पाणी वाढत नसल्याचे पाहून सिंचनासाठी सिंचन विहीर देण्याची योजना सुरू केली. दोन वर्षाच्या काळात फक्त ८७२ विहिरींचे काम पूर्ण झाले आहेत. तर १ हजार १२८ विहिरींचे काम अपूर्ण आहे.

११२८ विहिरींचे काम अपूर्णच
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दुष्काळावर मात करण्यासाठी व शेतकऱ्यांना सिंचनाची सोय करता यावी यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना सुरू करण्यात आली. तरीही भूगर्भातील पाणी वाढत नसल्याचे पाहून सिंचनासाठी सिंचन विहीर देण्याची योजना सुरू केली. दोन वर्षाच्या काळात फक्त ८७२ विहिरींचे काम पूर्ण झाले आहेत. तर १ हजार १२८ विहिरींचे काम अपूर्ण आहे.
राज्य सरकार द्वारे सिंचनविहीर शेतकऱ्यांसाठी वरदान असल्याचे समजले जाते. यामुळे सन २०१६-१७ मध्ये विदर्भातील ११ हजार शेतकऱ्यांना सिंचनविहीर देण्याचे उद्दीष्टे ठेवले होते. यात गोंदिया जिल्ह्यासाठी २ हजार विहिरींचे उद्दीष्ट ठेवून कामांना मंजूरी व कार्यारंभ आदेशही देण्यात आले. परंतु मागील दोन वर्षात खूप कमी विहिरींचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.
सन २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षात २ हजार विहिरींचे काम पूर्ण करायचे होते. मात्र आतापर्यंत फक्त ८७२ विहीरींचे (४३.६ टक्के) काम पूर्ण करण्यात आले असून १ हजार १२८ विहिरींचे (५६.४ टक्के) काम अपूर्ण असल्याने शेतकºयांचे सिंचन यंदाही फसणार आहे.
निसर्गाच्या क्रौर्यामुळे दरवर्षी अत्यल्प पावसाचा बळी शेतकरीच ठरत आहे. शासनाने शेतकºयांना सिंचनाची सोय म्हणून विहीर बांधून देण्याचा मानस बांधला. परंतु कॅबिनेट मंत्री असलेल्या राजकुमार बडोले यांच्या जिल्ह्यात शासनाच्या विहिरींची अशी दुरवस्था आहे.
जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागातील अधिकाºयांच्या उदासिनतेमुळे आतापर्यंत शेतकºयांना त्यांच्या हक्काच्या विहिरी उपलब्ध होऊ शकल्या नाही.
विहिरींमध्ये केले बोअरवेल
विहिरींमध्ये बोअरवेल करण्यात आलेल्या विहिरींची संख्याही बरीच आहे. गोरेगाव ६०, गोंदिया ७४, तिरोडा १५, आमगाव २०, सडक-अर्जुनी २४, देवरी १८, अर्जुनी-मोरगाव ४६ व सालेकसात ५२ सिंचन विहिरींवर बोअरवेल करण्यात आले. अर्जुनी-मोरगावच्या ३ विहिरींचे काम अयशस्वी झाले आहे.
कोट्यवधी रुपये पाण्यात
शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचन व्हावे यासाठी विहिरींची योजना पुढे आणली. परंतु पाणी कोणत्या ठिकाणी आहे हे न तपासता सरळ कुठेही विहीर खोदल्यामुळे जिल्ह्यातील ४२ विहिरींना पाणी लागले नाही. शासनाचे कोट्यवधी रूपये पाण्यात गेले आहे. ५७२ विहिरींचे काम ७५ टक्यापेक्षा अधिक झाले आहे. १५४ विहिरींचे काम ५० ते ७५ टक्के दरम्यान झाले आहे. २१५ विहिरींचे काम २५ ते ५० टक्के दरम्यान झाले आहे तर १८७ विहिरींचे काम २५ टक्यावर झाले आहे.
मिळाले २२ कोटी
सिंचन विहिरींसाठी राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला २२ कोटी ५० लाख रूपये दिले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला विहिरींच्या संख्येच्या आधारावर पैसे देण्यात आले आहे. शेतकºयांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून या विहिरींसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला परंतु काम संथ गतीने होत आहे.