महिला सरपंचाचे उपोषण सुरू

By Admin | Updated: February 26, 2015 00:56 IST2015-02-26T00:56:08+5:302015-02-26T00:56:08+5:30

तिडका-करड येथील ग्रामसेवकाची तात्पुरती बदली स्थगित करणे व उपसरपंचावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी महिला सरपंच अनिता मडावी यांनी...

The women's Sarpanch's fasting started | महिला सरपंचाचे उपोषण सुरू

महिला सरपंचाचे उपोषण सुरू

अर्जुनी-मोरगाव : तिडका-करड येथील ग्रामसेवकाची तात्पुरती बदली स्थगित करणे व उपसरपंचावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी महिला सरपंच अनिता मडावी यांनी बुधवारपासून (दि.२५) पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला सुरूवात केली.
प्राप्त माहितीनुसार, तिडका-करडगाव येथील ग्रामपंचायतमध्ये सुरळीतपणे विकास व इतर कामे सुरू असतानाही खंडविकास अधिकारी जी.डी. कोरडे यांनी ग्रामसेवक वरठे यांची इतरत्र तात्पुरती बदली केली. सरपंच मडावी यांनी यासंदर्भात खंडविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली असता, उपसरपंच आसाराम मेश्राम यांची ग्रामसेवकांविरूध्द तक्रार असल्याचे सांगितले. उपसरपंच आसाराम मेश्राम हे सतत सात ग्रामपंचायत सभांना अनुपस्थित आहेत. ते विकासाच्या कामात अडथळे घालत असून पैशाची मागणी करतात, असा आरोप केला असून उपसरपंच मेश्राम हे सतत ७ सभांना अनुपस्थित असल्यामुळे त्यांचे पद रिक्त करण्यात यावे व ग्रामसेवक वरठे यांची तात्पुरती बदली स्थगीत करावी अशी मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The women's Sarpanch's fasting started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.