चांदोरीटोला येथे महिला पालक सभा उत्साहात ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:49 IST2021-02-05T07:49:36+5:302021-02-05T07:49:36+5:30
परसवाडा : ग्राम चांदोरीटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कमल पटले यांच्या अध्यक्षतेखाली महिला पालक सभा आयोजित करण्यात आली ...

चांदोरीटोला येथे महिला पालक सभा उत्साहात ()
परसवाडा : ग्राम चांदोरीटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कमल पटले यांच्या अध्यक्षतेखाली महिला पालक सभा आयोजित करण्यात आली होती. यानिमित्ताने हळदी-कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. या पालक सभेचे उद्घाटन पुस्तकला तितीरमारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरिता पटले, मालन अंबुले, नूरजहाँ मालाधारी, लक्ष्मी वैघे, माजी सरंपच लीला गोंदुळे उपस्थित होत्या. प्रारंभी सरस्वती माता, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मुख्याधापिका वाय. एस. लिखार यांनी शाळा बंद असल्याने मातांनीच पहिली ते चौथीपर्यंतच्या आपल्या पाल्यांना आम्ही घरी येऊन शिकवलेल्या अभ्यासाचा सराव करुन घेण्याची सवय विद्यार्थ्यांना लावावी, असे सांगितले. यावेळी सर्व महिलांना मुख्याधापिका लिखार यांनी हळदी-कुंकू लावून वाणाचे वाटप केले. सूत्रसचांलन लिखार यांनी केले तर अंजू साखरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती व माता-पालक संघाच्या महिला उपस्थित होत्या.