चार पं.स.च्या सभापतिपदी होणार महिला विराजमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST2022-04-20T05:00:00+5:302022-04-20T05:00:01+5:30
जिल्हाधिकारी नयना गुंडे, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे व राजकीय पक्षाच्या सदस्यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील आठही पंचायत समिती सभापतिपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के ओबीसी आरक्षण रद्द केले. त्यामुळेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊन तीन महिन्यांच्या कालावधीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुका घेण्यात आल्या नव्हत्या.

चार पं.स.च्या सभापतिपदी होणार महिला विराजमान
लाेकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील आठही पंचायत समिती सभापतिपदाची आरक्षण सोडत मंगळवारी (दि. १९) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली. यात अर्जुनी मोरगाव, देवरी, तिरोडा, सडक अर्जुनी या चारही पंचायत समिती सभापतिपदाची सोडत सर्वसाधारण महिला निघाली. त्यामुळे या चार पंचायत समितीत सभापतिपदी प्रत्येकी अडीच वर्षांसाठी महिला विराजमान होणार आहेत.
जिल्हाधिकारी नयना गुंडे, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे व राजकीय पक्षाच्या सदस्यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील आठही पंचायत समिती सभापतिपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के ओबीसी आरक्षण रद्द केले. त्यामुळेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊन तीन महिन्यांच्या कालावधीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुका घेण्यात आल्या नव्हत्या.
ग्रामविकास मंत्रालयाच्या १२ एप्रिलच्या पत्रानंतर या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळेच जिल्हा निवडणूक विभागाने मंगळवारी जिल्ह्यातील आठही पंचायत समिती सभापतिपदासाठी आरक्षण सोडत काढली.
या आरक्षण सोडतीनंतर आता जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतिपदासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
देवरी व तिरोड्यात इच्छुकांचा हिरमोड
पंचायत समिती सभापतिपदाच्या आरक्षणाला घेऊन मागील तीन महिन्यांपासून निवडून आलेल्या सदस्यांच्या नजरा लागल्या होत्या. तर काही सदस्य सभापतिपदी आपलीच वर्णी लागणार, असे सांगत होते. मात्र, देवरी आणि तिरोडा पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण महिला झाल्याने अनेक इच्छुक सदस्यांचा हिरमोड झाला आहे.
कुणाची वर्णी लागणार ?
पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. सभापतिपदी नेमकी कुणाची वर्णी लावायची? हे ठरविताना नेत्यांचा चांगलाच कस लागणार आहे. यावेळी निवडून आलेले बहुतेक सदस्य हे प्रथमच निवडून आले आहेत. त्यामुळे पक्ष नेमका कोणता निकष लावून निवड करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जि.प. अध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग
- जिल्हा परिषद अध्यक्षाची निवडणूकही मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.