स्वयंपाकीन महिलांनी काढला जि.प.वर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 21:46 IST2018-10-22T21:45:22+5:302018-10-22T21:46:21+5:30

आपल्या विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालीका शाळेतील स्वयंपकीन महिला संघटनेने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले.

Women from self-employed women protested against ZP | स्वयंपाकीन महिलांनी काढला जि.प.वर मोर्चा

स्वयंपाकीन महिलांनी काढला जि.प.वर मोर्चा

ठळक मुद्दे२ हजारावर महिलांचा सहभाग : १३ दिवस देणार धरणे

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आपल्या विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालीका शाळेतील स्वयंपकीन महिला संघटनेने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले.
या आंदोलनात २ हजारावर महिलांचा सहभाग होता. हे आंदोलन सतत १३ दिवस म्हणजे २२ आॅक्टोबरपासून ते ३ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. शालेय पोषण आहार शिजविण्यासह शाळेतील इतर कामे करणाऱ्या स्वयंपाकी महिलांना फक्त १ हजार रूपये मानधनावर काम करावे लागते. तेही मानधन ५-५ महिने मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे जेवण तयार करणाºया स्वयंपाकीन महिला उपाशी राहण्याची पाळी आली आहे. त्यामुळे आपल्या मागण्यांना घेऊन त्यांनी जिल्हा परिषदवर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले.
स्वयंपाकीन महिलांना १० महिन्याऐवजी १२ महिन्याचे वेतन द्यावे, दरारोज २०० रूपये प्रमाणे मानधन द्यावे, किमान वेतन कायद्यांतर्गत किमान वेतन लागू करण्यात यावे, स्वयंपाकी महिलांना कायम करण्यात यावे, नव्याने स्वयंपाकीन महिलांची नियुक्ती शासनाने करावी, एखाद्या ठिकाणची विद्यार्थी संख्या कमी झाल्यास त्या ठिकाणच्या स्वयंपाकी महिलेला दुसऱ्या शाळेत हलविण्यात यावे, या मागण्यांना घेऊन आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष चंदा दमाहे, कार्याध्यक्ष मनोज दमाहे, शिवनाथ खरोले, प्रमिला राऊत, प्रतिभा बडगे, सुनिता पाऊलझगडे, देवका नरेश बहेकार, गीता सोनवाने, भोजराम वाढई, सरीता उके यांनी केले.

Web Title: Women from self-employed women protested against ZP