महिला प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन संधीचे सोने करतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:49 IST2021-02-05T07:49:12+5:302021-02-05T07:49:12+5:30

परसवाडा : आज महिला सर्व क्षेत्रात यशस्वीरित्या कार्यरत आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन व तांत्रिक या क्षेत्रांसह महिला वैमानिक ...

Women overcome adversity and seize opportunities | महिला प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन संधीचे सोने करतात

महिला प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन संधीचे सोने करतात

परसवाडा : आज महिला सर्व क्षेत्रात यशस्वीरित्या कार्यरत आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन व तांत्रिक या क्षेत्रांसह महिला वैमानिक म्हणूनही कार्यरत आहेत. देशसेवेसाठी सीमेवरही तैनात आहेत. पुरुषांच्या खाद्याला खांदा लावून प्रत्येक कामात महिला बरोबरीने काम करत आहेत. म्हणूनच महिलांना संधी दिली गेली पाहिजे, त्या संधीचे महिला निश्चित सोने करतात, यात शंका नाही, असे प्रतिपादन उपकार्यकारी अभियंता शिखा पिपरेवार यांनी केले.

ग्रामविकास महिला समितीच्यावतीने आयोजित महिला आरोग्य, हळदी-कुंकू, योग, मास्क प्रशिक्षण मेळाव्यात त्या बोलत होत्या. या मेळाव्याचे उद्घाटन छाया दसरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी माधुरी रहांगडाले होत्या. दीपप्रज्वलन सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, शिखा पिपरेवार, सविता तुरकर, सहयोगच्या व्यवस्थापिका कुसुम चतुर्वेदी, डॉ. शैफाली वैद्य, उपसंरपच गंगासागर म़ंडले, ॲड. हेमलता फतेह, पूजा तिवारी, दुर्गा दमाहे, निशा डोहळे यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात रंजना मेंढे, रचना गुप्ता, सरोज आहुजा, शारदा भोजवानी, श्रीकटकवार यांनी योगासने, ध्यान केंद्र यावर महिलांना प्रात्यक्षिक करून दाखवले. बरखा कनोजिया, योजना कोतवाल, प्रेमा शर्मा यांनी लायनेस क्लबबद्दल माहिती दिली. महिला कायद्यांविषयी पोलीस हवालदार आशा खोब्रागडे, ॲड. हेमलता फतेह, स्मिता डाहाके यांनी माहिती दिली. सूत्रसंचालन प्रतिमा लिल्हारे यांनी केले तर सुनीता लिल्हारे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी ममता लिल्हारे, उर्मिला धुवारे, तीजा मस्करे, सविता पटले, वैशाली बाळणे, कृष्णा माहुले, भारती बागडे, भूरी उके, दुर्गा दमाहे, ममता दमाहे, विनेश्वरी खोब्रागडे, दमंयती भोयर, अंजू लांजेवार, श्वेता रंगारी, रजनी शौलकी, शिबा दसरे, पुष्पा रहांगडाले, संगीता उरकुडे यांनी सहकार्य केले.

Web Title: Women overcome adversity and seize opportunities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.