महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोहारे कुटुंबाला मदत ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:19 IST2021-07-19T04:19:25+5:302021-07-19T04:19:25+5:30

१३ जूनला रात्री मोहारे कुटुंब झोपले असता दिलीप मोहारे यांच्या पत्नीला आणि मुलाला सर्पाने दंश केल्याने त्यांचा मृत्यू झाला. ...

Women Nationalist Congress helps Mohare family () | महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोहारे कुटुंबाला मदत ()

महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोहारे कुटुंबाला मदत ()

१३ जूनला रात्री मोहारे कुटुंब झोपले असता दिलीप मोहारे यांच्या पत्नीला आणि मुलाला सर्पाने दंश केल्याने त्यांचा मृत्यू झाला. दिलीप मोहारे हा स्वत:चा हातपायाने अपंग असून, कुटुंबात फक्त दोन मुली राहिल्या आहेत. त्यांच्यावर दिव्यांग वडिलांची जबाबदारी आली. ही व्यथा ‘लोकमत’ने प्रकाशित केली असता बातमीची दखल घेत जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी स्वत: मोहारे कुटुंबाला भेट देऊन मदत केली होती. तसेच इतर अधिकाऱ्यांना मदतीचे आवाहन केले होते. त्यामुळे त्या कुटुंबाला बरीच मदत मिळाली आहे. असे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर आणि माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य दुर्गा तिराले यांनी आपल्या महिला सहकाऱ्यांसह मोहारे यांच्या घरी भेट दिली व त्यांना मदत स्वरूप रोख रक्कम भेट दिली.

Web Title: Women Nationalist Congress helps Mohare family ()