४६ ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:45 IST2021-02-05T07:45:39+5:302021-02-05T07:45:39+5:30

आरक्षण सोडतीनुसार, चिरेखनी, बोदा, अत्री, धादरी, सर्रा व कोयलारी ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जातीचे पुरुष सरपंच राहतील. अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारांसाठी ...

Women manage 46 gram panchayats | ४६ ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती

४६ ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती

आरक्षण सोडतीनुसार, चिरेखनी, बोदा, अत्री, धादरी, सर्रा व कोयलारी ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जातीचे पुरुष सरपंच राहतील. अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारांसाठी नवेगाव खु., सेजगाव, बयेवाडा, काचेवानी व गराडा ग्रामपंचायतचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. अनुसूचित जमातीसाठी चुरडी, निमगाव, बेरडीपार (खु.) व सेलोटपार ग्रामपंचायत, तर सीतेपार, बरबसपुरा, बिहिरिया व गुमाधावडा ग्रामपंचायतमध्ये अनुसूचित जमातीच्या महिला उमेदवारांसाठी सरपंचपद राखीव करण्यात आले आहे. भजेपार, करटी बु., लाखेगाव, घोगरा, चिखली, सातोना, सिल्ली, जमुनिया, बोदलकसा, करटी खु., गांगला व डब्बेटोला ग्रामपंचायत नामाप्र उमेदवारांसाठी, तर गोंडमोहाडी, बेरडीपार/काचे, सरांडी, मेंढा, बोरा, सोनेगाव, घाटकुरोडा, मुंडीपार, विहीरगाव, बिरोली, पिंडकेपार, चोरखमारा व मारेगाव ग्रामपंचायत नामाप्र महिला उमेदवारांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील वडेगाव, सुकळी, पालडोंगरी, ठाणेगाव, केसलवाडा, कोडेलोहारा, इंदोरा बु., बिरसी, मेंदीपूर, मांडवी, लोणारा, डोंगरगाव, भिवापूर, खडकी, खाणारी, भोंबोडी, खैरलांजी, माल्ही, पिपरिया, सालेबडी, चांदोरी बु.,नवरगाव, बघोली, सावरा, लेदडा, ग्रामपंचायतमध्ये सर्वसाधारण पुरुष, तर अर्जुनी, कवलेवाडा, मुडीकोटा, इदोरा खु., परसवाडा, खैरबोडी, चांदोरी खु., बोपेसर, मंगेझरी, मलपुरी, सोनेखारी, बेलाटी बु.,खोपडा, पांजरा, मुरमाडी, मरारटोला, खुरखुडी, आलेझरी, पुजारीटोला मनोरा, येडमाकोट, नहरटोला, बोरगाव व मुरपार इत्यादी ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच राहणार आहेत. सोडतीदरम्यान तहसीलदार प्रशांत घोरुडे व नायब तहसीलदार नागपुरे उपस्थित होते.

.........

Web Title: Women manage 46 gram panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.