बचत गटांनी केला महिलांचा सत्कार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:28 IST2021-03-18T04:28:32+5:302021-03-18T04:28:32+5:30
अध्यक्षस्थानी शिक्षिका गुणवंता नेवारे होत्या. उद्घाटन पोलीस निरीक्षक प्रतिभा पडोळे यांच्या हस्ते करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून प्रिया शरणागत, ॲड. ...

बचत गटांनी केला महिलांचा सत्कार ()
अध्यक्षस्थानी शिक्षिका गुणवंता नेवारे होत्या. उद्घाटन पोलीस निरीक्षक प्रतिभा पडोळे यांच्या हस्ते करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून प्रिया शरणागत, ॲड. रंजीता खोब्रागडे, डॉ. भावना कांभडकर, लक्ष्मी भूते, लीला ब्राह्मणकर, वंदना भालेकर, साधना बोरकर, वंदना प्रदीते, राधा बहेकार, सुरेखा देशकर, सुनंदा उके, उषा भांडारकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले आणि जिजामाता यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी महिलांनी इतनी शक्ती हमे देना दाता ही ही प्रार्थना गीत सादर केले. यावेळी श्रद्धा बचत गटाच्या सचिव अरुणा गोंडाने, अध्यक्ष रश्मी पारवे, सावित्री मंचच्या सदस्य मनीषा बागडे, वैशाली रामटेके यांनी गरजू होतकरू महिलांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. संचालन विद्या साखरे यांनी केले. आभार प्रियंका डोंगरे यांनी मानले. प्रास्ताविक सुनंदा हुमे व ममता बन्सोड यांनी मांडले. याप्रसंगी रेखा दमाहे, अनिता कटरे, गुड्डी रामटेके, संध्या कन्नमवार, निशात कन्नमवार, मनीषा उके, तोशिका पटले, संगीता मेश्राम, सुनंदा निखारे, सुशील कुंभारे, ललिता लिल्हारे, अनिता टेंभुर्णीकर, मंगला शिंगाडे, दिलेश्वरी फुंडे, रेखा फुंडे आदी उपस्थित होत्या.