महिला सक्षमीकरण व सत्कार सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:25 IST2021-02-08T04:25:47+5:302021-02-08T04:25:47+5:30

अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष भावना कदम होत्या. उद्‌घाटन जिल्हा परिषदेच्या माजी सभापती छाया दसरे तर दीपप्रज्वलन उपकार्यकारी ...

Women empowerment and felicitation ceremony in full swing | महिला सक्षमीकरण व सत्कार सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरण व सत्कार सोहळा उत्साहात

अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष भावना कदम होत्या. उद्‌घाटन जिल्हा परिषदेच्या माजी सभापती छाया दसरे तर दीपप्रज्वलन उपकार्यकारी अभियंता शिखा पिपलेवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून, सरपंच रेखा चिखलोंडे, उपसरपंच गंगासागर मंडले, पोलीस पाटील दमयंती लिल्हारे, हेमलता पटले, संगीता घोष, डॉ. प्रीती कटरे, शालीनी टेंभरे, सरिता कुळकर्णी, हेमलता पतेह, प्रतिमा लिल्हारे, पूजा तिवारी, सविता बेदरकर, दुर्गा दमाहे, ओमेश्वरी ढेकवार, आशा खोब्रागडे, निलेश्वरी खोब्रागडे, सुनिता लिल्हारे, दया राऊत, रचना धुर्वे उपस्थित होते.

सर्वप्रथम सरस्वती माता व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे जिल्हा संघटनमंत्री संजय कुळकर्णी, धनलाल ठाकरे, राकेश खरोले, आशा चिखलोंढे, धनपाल धुवारे, रामप्रसाद कन्सरे, सतीश दमाहे, दुर्योधन भोयर, चुन्नीलाल बोरकर, सुरेश लिल्हारे, चैनलाल लिल्हारे, राजेंद्र बहेटवार, हितेंद्र लिल्हारे, आत्माराम दसरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कोरोनाकाळात सेवा देणाऱ्या आरोग्यसेविका, अंगणवाडीसेविका, मदतनीस, आशा सेविका व पोलीस पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन स्मिता डहाके यांनी केले. गुड्डू लिल्हारे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी सर्व बचत गट महिला, सीआरपी यांनी सहकार्य केले.

Web Title: Women empowerment and felicitation ceremony in full swing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.