महिला सशक्तीकरण व शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:31 IST2021-02-09T04:31:49+5:302021-02-09T04:31:49+5:30
दोन दिवसीय कार्यशाळेत पहिल्या दिवशी ६ फेब्रुवारीला बुद्ध विहार समन्वय समितीचे मुख्य संयोजक अशोक सरस्वती यांनी बुद्ध विहार ...

महिला सशक्तीकरण व शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळा
दोन दिवसीय कार्यशाळेत पहिल्या दिवशी ६ फेब्रुवारीला बुद्ध विहार समन्वय समितीचे मुख्य संयोजक अशोक सरस्वती यांनी बुद्ध विहार संस्कृती निर्मितीसाठी आणि बौद्ध समाजात संगटितपणा, बंधुभाव, शिस्त, शील-सदाचारी वृत्ती रुजविण्यासाठी बुद्ध विहार समन्वय समितीची उपयुक्तता या विषयावर मार्गदर्शन केले. ‘टीम आता लढू या एकीनेच’ नागपूरचे अतुल खोब्रागडे व माजी शिक्षणाधिकारी एन.एम.ठमके यांनी ‘विद्यार्थ्यांपुढील आव्हान व त्याचे समाधान’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये महिलांची भूमिका या विषयावर आयोजित महिला सशक्तीकरण कार्यशाळेत पौर्णिमा नागदेवे, माधुरी भेलावे, रिना भोंगाडे, किरण वासनिक, माधुरी पाटील, ललिता बोम्बार्डे, उमा गजभिये, नीलू मोहंती, विमल मेश्राम, सामाजिक कार्यकर्त्या संध्या बन्सोड, किरण मेश्राम, माधुरी नंदेश्वर, सविता उके, समता गणवीर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक आंबेडकरी संस्कार केंद्र संचालक महेंद्र कठाने यांनी मांडले. कार्यक्रमाचे संचालन लक्ष्मी राऊत यांनी केले. आभार राणी अवंतीबाई लोधी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिव नागपुरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी संयोजक अतुल सतदेवे, संरक्षक मित्र वैशाली डोंगरे, आयोजक मंडळ संविधान मैत्री संघ, बुद्धविहार समन्वय समिती, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, मैत्रीय बुद्ध विहार महिला मंडळ, आंबेडकरी चळवळीचे संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांनी यांनी सहकार्य केले.