अस्वलाच्या हल्यात महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:24 IST2017-10-04T23:24:31+5:302017-10-04T23:24:41+5:30
आमगाव तालुक्यातील बघेडा हनुमानटोला येथे शेतशिवारात गवत कापण्यासाठी गेलेल्या महिलेवर अस्वलाने हल्ला केला.

अस्वलाच्या हल्यात महिला ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
ंआमगाव : आमगाव तालुक्यातील बघेडा हनुमानटोला येथे शेतशिवारात गवत कापण्यासाठी गेलेल्या महिलेवर अस्वलाने हल्ला केला. यात महिला ठार झाल्याची घटना बुधवारी (दि.४) दुपारच्या सुमारास तालुक्यातील बघेडा येथे घडली. बिरणबाई पाडुरंग उईके (७५) असे अस्वलाच्या हल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
बिरणबाई बघेडा येथील शेतशिवारात गवत कापण्यासाठी गेली होती. दरम्यान दबा धरुन बसलेल्या अस्वलाने तिच्यावर अचानक हल्ला केला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक चन्ने व पोलीस प्रशासनाने घटनास्थळाकडे धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस विभाग व वनविभागाचे अधिकारी करित आहेत.