समस्यांना घेऊन नगरपंचायतवर महिलांचा हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 06:00 IST2019-11-30T06:00:00+5:302019-11-30T06:00:22+5:30
सडक अर्जुनी नगर पंचायतची मुख्य समस्या स्वस्त धान्य दुकानाची आहे. स्वस्त धान्य दुकानदार हा सडक अर्जुनी येथील नसून तो बाहेरगावचा आहे. आपल्या अरेरावी प्रवृत्तीमुळे असंख्य लाभार्थ्यांची तो दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. तसेच महिन्यातून फक्त २ ते ३ दिवसच स्वस्त धान्य वाटप करतो. त्यामुळे अनेक लाभार्थी वंचित राहतात.

समस्यांना घेऊन नगरपंचायतवर महिलांचा हल्लाबोल
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : येथील ग्रामपंचायतचे नगर पंचायतमध्ये रुपांतर झाले.परंतु गावकऱ्यांच्या समस्या मार्गी लागण्याऐवजी त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. समस्याग्रस्त शेकडो संतप्त महिलांनी शुक्रवारी (दि.२९) नगर पंचायतवर हल्लाबोल केला.समस्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांच्या नावे तहसीलदारांना देण्यात आले.
सडक अर्जुनी नगर पंचायतची मुख्य समस्या स्वस्त धान्य दुकानाची आहे. स्वस्त धान्य दुकानदार हा सडक अर्जुनी येथील नसून तो बाहेरगावचा आहे. आपल्या अरेरावी प्रवृत्तीमुळे असंख्य लाभार्थ्यांची तो दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. तसेच महिन्यातून फक्त २ ते ३ दिवसच स्वस्त धान्य वाटप करतो. त्यामुळे अनेक लाभार्थी वंचित राहतात. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार हा सडक अर्जुनीचाच असावा आणि सर्वांना धान्य वितरीत करण्यात यावे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नगर पंचायत करु शकत नाही.
नगरातील जनतेला दूषीत पाणी पुरवठा केला जातो. नळाद्वारे येणारे पाणी गढूळ व दूषित आहे. पाण्यामुळे अनेक प्रकारचे आजार होत असून पाणीपट्टी कर हा पहिल्यापेक्षा दुप्पट वाढविला आहे. नगर पंचायतने शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. शासनाच्या घरकुल योजनेचा दोन वर्षांपासून जनतेला लाभ मिळाला नाही. अधिकारी वर्ग आणि पुढारी घरकुल योजनेतून आपल्याला काहीही फायदा होणार नाही म्हणून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. तसेच घरकुल योजनेचे जे खरे लाभार्थी आहे, त्यांना डावलून आपल्या मर्जीतील लोकांचे नाव समाविष्ट करीत असल्याचा आरोप केला आहे. नगर पंचायतचे कर्मचारी सर्वसामान्य लोकांना सभ्यतेची वागणूक देत नसून असभ्यपणाची व उडवाउडवीचे उत्तरे देतात. अशा कर्मचाºयांवर कारवाई करण्यात यावी. बगीच्या,स्वच्छता, आरोग्य याचाही समावेश आहे. नगर पंचायतच्या समस्या न सुटल्यास महिलांना आंदोलन करावे असा इशाराही या वेळी दिला. या महिलांनी आपला मोर्चा पंचायत समितीकडे ही नेला होता.परंतु खंडविकास अधिकारी उपस्थित नव्हते.
मोर्चाचे नेतृत्व वैशाली गिºहेपुंजे, कविता भिवगडे, मिरा झोडवने, वेनू झिंगरे, माया हुडे, उषा होळकर, पुष्पा गुप्ता, कल्पना भेंडारकर, सिंदू गिºहेपुंजे, पुष्पा सानेकर, शिंदू मालदे, इंदू परिहार, प्रभा ठाकरे, लता मालदे यांनी केले असून १३५ महिलांनी समस्या निवेदनावर स्वाक्षºया केल्या आहे.