ट्रॅक्टर उलटल्याने महिलेचा मृत्यू,पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:23 IST2021-07-17T04:23:32+5:302021-07-17T04:23:32+5:30

प्राप्त माहितीनुसार नवेगावबांध येथून मजूर घेऊन हा ट्रॅक्टर क्र. एमएच ३५, ८१०५ ट्राली क्र. एमएच ३५ डी ८१४० गोठणगावच्या ...

Woman killed, five injured in tractor overturn | ट्रॅक्टर उलटल्याने महिलेचा मृत्यू,पाच जखमी

ट्रॅक्टर उलटल्याने महिलेचा मृत्यू,पाच जखमी

प्राप्त माहितीनुसार नवेगावबांध येथून मजूर घेऊन हा ट्रॅक्टर क्र. एमएच ३५, ८१०५ ट्राली क्र. एमएच ३५ डी ८१४० गोठणगावच्या वामन चांदेवार यांचे शेतात रोवणीसाठी जात होता. त्यात ७ महिला व दोन पुरुष मजूर होते. सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास कवठा जंगल परिसरात समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला साईड देत असताना तोल जाऊन ट्रॅक्टरची ट्राली उलटली. यात सत्यभामा मनिराम कुंभरे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. मृतकाची सून गायत्री अशोक कुंभरे (२८) हिचा या अपघातात पाय तुटला. तर देवांगणा वामन चांदेवार (५०), संगीता मुकेश चाफेकर (४०), विमल सितकुरा बडोले (६०),पंचफुला युवराज साखरे (६५) या सुध्दा जखमी झाल्या. दरम्यान घटनास्थळावर उपस्थित नागरिकांनी जखमींना नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमींवर उपचार सुरु आहे. तहसीलदार विनोद मेश्राम यांनी नवेगावबांधच्या ग्रामीण रुग्णालयात जखमींची विचारपूस केली.

..............

Web Title: Woman killed, five injured in tractor overturn