समाज संघटनेशिवाय न्याय मिळणार नाही- भेलावे

By Admin | Updated: October 14, 2014 23:20 IST2014-10-14T23:20:27+5:302014-10-14T23:20:27+5:30

गोंदिया व भंडारा जिल्ह्यात तेली समाज बहुसंख्य असूनही तेली समाजावर सातत्याने अन्याय होत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समाजाला संघटित राहून संघर्ष केल्याशिवाय न्याय मिळणार नाही,

Without a social organization, justice will not be done - send it | समाज संघटनेशिवाय न्याय मिळणार नाही- भेलावे

समाज संघटनेशिवाय न्याय मिळणार नाही- भेलावे

गोंदिया : गोंदिया व भंडारा जिल्ह्यात तेली समाज बहुसंख्य असूनही तेली समाजावर सातत्याने अन्याय होत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समाजाला संघटित राहून संघर्ष केल्याशिवाय न्याय मिळणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेचे जिल्हा अध्यक्ष उमेंद्र भेलावे यांनी येथे आयोजित तेली समजाच्या कोजागिरी कार्यक्रमात व्यक्त केले.
११ आॅक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेश महासचिव कृष्णराव हिंगणकर यांनी, कोजागिरीच्या माध्यमातून समजाला संघटित करुन त्यांच्या मुलभूत समस्या व प्रश्न समजून घेण्याकरिता एक सशक्त कार्यक्रम म्हणून हा उपक्रम सर्व जिल्ह्यात राबवावा असे आवाहन केले.
याप्रसंगी अभियांत्रीकी विषयात पीएचडी मिळविल्याबद्दल डॉ. प्रभाकर खंडाईत व डॉ. सुनंदा खंडाईत या दांपत्यांचा जाहिर सत्कार करण्यात आला. तसेच तेली समजातील प्राविण्य प्राप्त होतकरु विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाकरीता विशेष आमंत्रित महाराष्ट्राचे हास्य सम्राट डॉ. मिर्झा रफि बेग यांच्या ‘मिर्झा एक्सप्रेस’ या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमात मंचावर विभागीय अध्यक्ष अ‍ॅड. धनराज खोब्रागडे, विभागीय महिला उपाध्यक्ष रेखा भोंगाडे, सुनंदा पोहाणे, महिला अर्बन बँकेच्या अध्यक्ष डॉ. माधुरी नासरे, भंडारा युवा आघाडीचे अध्यक्ष रामू शहारे, जिल्हा कार्यध्यक्ष डी.आर. गिऱ्हेपुंजे, सेवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हरीराम येरणे, जिल्हा महिला आघाडीचे अध्यक्ष सुनिता धरमशहारे, शहर अध्यक्ष तोमिचंद कापसे इत्यादी उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा कोषाध्यक्ष अशोक पडोळे, वामन कळंबे, भक्तराज भेलावे, रुपेश तळवेकर, प्रदिप बावनकर (रावणवाडी) विनोद पंचभाई, संजय पारडकर, पदमाकर धरमशहारे, बळीराम डारले, जनार्दळ गिऱ्हेपुंजे, हरीश चिंधालोरे, कैलाश भेलावे, संतोष वैद्य, कमल हटवार, शंकर चामट, गंगाराम बावनकर, डॉ. अमित खोडनकर, डॉ. स्नेहल सुरकर, यामिनी धुर्वे, अल्का पडोळे, विद्या पंचभाई, ज्योती भेलावे, पायल भेलावे, मंजुषा आकरे, रश्मि तळवेकर, रेखा कापसे, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सचांलन जिल्हा सचिव मुकुंद धुर्वे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजबांधवांनी सहकार्य केले.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Without a social organization, justice will not be done - send it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.