सामाजिकता जोपासतात हिवाळी स्पर्धा

By Admin | Updated: November 13, 2015 01:48 IST2015-11-13T01:48:25+5:302015-11-13T01:48:25+5:30

स्वदेशी खेळांच्या माध्यमातून तरुणांच्या सुप्त गुणांना वाव मिळते. खेळाच्या माध्यमातून समाज व गावकरी एकत्र येतात.

Winter tournaments that promote socialism | सामाजिकता जोपासतात हिवाळी स्पर्धा

सामाजिकता जोपासतात हिवाळी स्पर्धा


चिचगड : स्वदेशी खेळांच्या माध्यमातून तरुणांच्या सुप्त गुणांना वाव मिळते. खेळाच्या माध्यमातून समाज व गावकरी एकत्र येतात. या निमित्ताने सामाजिकता जोपासण्याचे खरे माध्यम म्हणजे हिवाळी कबड्डी स्पर्धा होत, असे प्रतिपादन नवनिर्वाचित जि.प. सदस्य अलताफ हमीद यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.
ग्राम पांढरा (गवळीटोला) येथे प्रगत बहुउद्देशीय क्रीडा मंडळ गवळीटोला-वाढरा अंतर्गत तीन दिवशीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या.
क्रीडा सत्राचे उद्घाटन आमदार संजय पुराम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य अलताफ हमीद होते. अतिथी म्हणून भाजपा महामंत्री विरेंद्र अंजनकर, सुरेश गिऱ्हेपुंजे, मोतीलाल विदहे, देवकी मरई, मारोतराव खंडारे, सरपंच सुरेश वाढई, तंमुसचे अध्यक्ष भोजराज कश्यप उपस्थित होते.
कबड्डी स्पर्धेत अनेक गावावरून आलेल्या ५५ चमूंनी सहभाग घेतला होता. यात आदिवासी क्रीडा मंडळ दर्रेकसा या चमूने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक कबड्डी क्रीडा मंडळ पिंडकेपार तर तृतीय क्रमांक धुकेश्वरी क्रीडा मंडळने मिळविला.
प्रास्ताविक तुळशीराम तिरगम यांनी केले. आभार मनोहर तिरगम यांनी मानले.
स्पर्धेच्या यशस्वितेसाठी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष नृपराज तिरगम, सचिव देवदास कुंभरे, राकेश सलामे, सचिन अत्तरगडे, उमेश अत्तरगडे, अनिल अत्तरगडे, दीपक सलामे, चिंतामन तिरगम, हिवराज तिरगम, चैतराम कुंभरे, हरी सलामे आदींनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: Winter tournaments that promote socialism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.