दिनकरनगर ग्रामस्थांच्या समस्या सोडविणार

By Admin | Updated: May 16, 2017 01:02 IST2017-05-16T01:02:24+5:302017-05-16T01:02:24+5:30

दिनकरनगर हे संपूर्ण गाव बंगाली बांधवांचे आहे. या ग्रामस्थांच्या समस्या अनेक वर्षापासून आहेत.

Will solve the problems of Dinakarnagar villagers | दिनकरनगर ग्रामस्थांच्या समस्या सोडविणार

दिनकरनगर ग्रामस्थांच्या समस्या सोडविणार

पालकमंत्री बडोले : बंगाली शाळेत बंगाली शिक्षक लवकरच
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिनकरनगर हे संपूर्ण गाव बंगाली बांधवांचे आहे. या ग्रामस्थांच्या समस्या अनेक वर्षापासून आहेत. त्यांच्या समस्यांची सोडवणूक आपण प्राधान्याने करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील दिनकरनगर या बंगाली बांधवांच्या गावाला पालकमंत्री बडोले यांनी १३ मे रोजी भेट दिली. ग्रामपंचायत कार्यालय येथे बैठक घेवून त्यांच्या समस्या ऐकूण घेतल्या. जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स. सभापती अरविंद शिवणकर, जि.प. सदस्य तेजुकला गहाणे, माजी जि.प. सभापती उमाकांत ढेंगे, प्रकाश गहाणे, पं.स. सदस्य अर्चना राऊत, रामलाल मुंगणकर, तहसिलदार बांबोर्डे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, सरपंच खोकन सरकार, उपसरपंच सचिन घरामी उपस्थिती होते.
पालकमंत्री बडोले म्हणाले, बंगाली शाळांमध्ये बंगाली शिक्षक असावे ही आपली जूनी मागणी आता लवकरच पूर्ण होणार आहे. बंगाली शिक्षक भरती बाबतचा प्रस्ताव शिक्षण आयुक्त पुणे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. इथल्या शेतकऱ्यांच्या सोसायटीला धान ठेवण्यासाठी जागा उपलब्ध झाल्यास त्याठिकाणी गोदाम बांधून देण्यात येईल.
दिनकरनगर ग्रामपंचायत येणाऱ्या गावात लवकरच पथदिवे लावून देण्यात येईल, असे सांगून बडोले पुढे म्हणाले, आवश्यक त्या ठिकाणी रस्त्यांची कामे करण्यात येतील. पुष्पनगर मार्गावरील नदीवर पूल बांधण्यासोबतच ग्रामपंचायतसाठी नविन सभागृह तयार करु न देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. सरपंच सरकार यांनी यावेळी दिनकरनगर व अंतर्गत येणाऱ्या गावाच्या समस्यांची माहिती पालकमंत्र्यांना यावेळी दिली.

Web Title: Will solve the problems of Dinakarnagar villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.