टप्प्याटप्प्याने होणार बाप्पांचे विसर्जन

By Admin | Updated: September 6, 2014 23:57 IST2014-09-06T23:57:12+5:302014-09-06T23:57:12+5:30

महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणपती बाप्प्यांचे २९ आॅगस्ट रोजी आगमन झाले. ६ सप्टेंबरपासून गोंदिया शहरातील बाप्पांच्या विसर्जनाला सुरूवात झाली आहे. एकाच वेळी सर्वच गणेशमूर्तीचे विसर्जन

Will be held in phases | टप्प्याटप्प्याने होणार बाप्पांचे विसर्जन

टप्प्याटप्प्याने होणार बाप्पांचे विसर्जन

गोंदिया : महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणपती बाप्प्यांचे २९ आॅगस्ट रोजी आगमन झाले. ६ सप्टेंबरपासून गोंदिया शहरातील बाप्पांच्या विसर्जनाला सुरूवात झाली आहे. एकाच वेळी सर्वच गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात अडचण निर्माण होत असते. त्यामुळे नियोजनबद्धरीत्या टप्प्या-टप्प्याने बाप्पाचे विसर्जन करण्याचे वेळापत्रक आखण्यात आले आहे.
गोंदिया शहरात एकूण ८५ सार्वजनिक गणेशमुर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणपती असल्याने पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक मंडळाला विसर्जनासाठी निश्चित वेळ दिली आहे. शहरातील सर्कल १ मध्ये २३, सर्कल २ मध्ये ३०, सर्कल ३ मध्ये १८, सर्कल ४ मध्ये १४ गणेशमुर्ती अशा एकूण ८५ गणेशमुर्ती आह. ६ स्पटेंबर रोजी सात दिवस पुर्ण होत असल्याने या दिवशी ३ सार्वजनिक गणेशांचे विसर्जन होणार आहे. यात रजेगाव धाटावर १ तर छोटा गोंदिया तलावात २, ७ स्पटेंबर रोजी एकूण पाच गणपतींचे विसर्जन होणार असून रजेगाव घाटावर २ पांगोली नदी १, पिंडकेपार नाला १, गौरीनगर नाला १ यांचा समावेश आहे. ८ स्पटेंबर रोजी एकूण १९ बाप्पांचे विसर्जन होणार असून रजेगाव घज्ञटावर १८, पांगोली नदी (आमगाव मार्ग) ४, पांगोली नदी (छोटा गोंदिया) १, पिंडकेपार नाला २, शासकीय तलाव (रेल्वे ट्रॅक ) २, चिरबंदी तलाव (फुलचूर टोला) १, फुलचूर राममंदिर तलाव १, छोटा गोंदिया तलाव ( इंदिरानगर पिंडकेपार) यांचा समावेश आहे.
९ सप्टेंबर रोजी एकूण १७ बाप्पांचे विसर्जन होणार असून रजेगाव घज्ञटावर १७, पांगोली नदी (आमगाव मार्ग) ६, पांगोली नदी (छोटा गोंदिया) २, पिंडकेपार नाला १०, चिरबंदी तलाव १, गोविंदपूर साई मंदिर तलावात ४, छोटा गोंदिया तलाव ४, मुर्री गावतलाव २, भदाड्या तलाव फुलचूर टोला १, नवीन तलाव १, १० सप्टेंबर रोजी एकूण ४ बाप्पांचे विसर्जन होणार असून पांगोली नदीवर १, पिंडकेपार नाला २, शासकीय तलाव १ यांचा समावेश आहे. ११ सप्टेंबर रोजी शहरातील २ तर १२ सप्टेंबर रोजी २ सार्वजनिक गणेशांचे विसर्जन करण्यात येणार आहे.
विसर्जनादरम्यान शहरातील रस्त्यांवर गर्दी झाल्याने वाहतुकीची समस्या निर्माण हात होती. शिवाय, वेगवेगळ्या गटांमध्ये भांडणेदखील होत होते. या सर्व बाबी टाळण्यासाठी मागील चार ते पाच वर्षापासून गोंदिया पोलिसांनी टप्प्या-टप्याने गणेशांचे विसर्जन करण्याची पद्धती अवलंबिली आहे. यामुळे सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना त्यांच्या सोयीने विसर्जन क रण्याची मोकळीक मिळते.
जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान अप्रिय घटना घडू नये, शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. विशेषत: विसर्जनस्थळी पोलीस प्रशासनाकडून विशेष उपाययोजना करण्यात येणार असून रजेगाव येथील घाटावर विद्युत व्यवस्था वायरलेस सेट लावण्यात येणार आहे. पाण्यात काही अंतरावर दोरीच्या साहाय्याने मर्यादारेषा आखण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेश मुर्तीच्या विसर्जनावेळी गृहरक्षक दलाचे जवान व पोलीस कर्मचरी तैनात करण्यात येणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Will be held in phases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.