वसतिगृह व निवासी शाळा झाल्या ‘वायफाय’

By Admin | Updated: August 31, 2016 00:10 IST2016-08-31T00:10:44+5:302016-08-31T00:10:44+5:30

अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना जगाचे ज्ञान सहजपणे उपलब्ध व्हावे यासाठी विशेष समाजकल्याण

'Wifi' for hostel and residential schools | वसतिगृह व निवासी शाळा झाल्या ‘वायफाय’

वसतिगृह व निवासी शाळा झाल्या ‘वायफाय’

समाजकल्याण विभागाचा पुढाकार : इंग्रजी बळकटीकरणावर दिला जातोय भर
गोंदिया : अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना जगाचे ज्ञान सहजपणे उपलब्ध व्हावे यासाठी विशेष समाजकल्याण विभागाने जिल्ह्यातील चारही वसतिगृह व दोन निवासी शाळांना ‘वायफाय’ कनेक्टीव्हीटी दिली आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना स्वत:जवळील पैसे खर्च न करता आॅनलाईन कामे करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
जिल्ह्यात समाजकल्याण विभागाकडून चालविली जाणारे चार वसतिगृह आणि तीन निवासी शाळा आहेत. गोंदियात मुलींचे व मुलांचे वसतिगृह, तिरोड्यात मुलींचे वसतिगृह, अर्जुनी-मोरगाव येथे मुलांचे वसतिगृह आहेत. त्यांच्यासह डव्वा येथील निवासी मुलींची शाळा, नंगपूरा मुर्री येथील मुलांची शाळा वायफाय करण्यात आली. सरांडी येथील मुलींची निवासी शाळा वायफाय करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
विद्यार्थी मागास राहू नयेत, त्यांना वर्तमान स्थितीबद्दलचे ज्ञान मिळवता यावे यासाठी शब्दकोष व अवांतर वाचनासाठी ९ प्रकारच्या पुस्तिका पुरविण्याच्या सूचना सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिल्यामुळे त्या पुस्तिका विद्यार्थ्यांना पुरविण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व निर्माण करण्यासाठी त्यांना विशेष पुस्तके पुरविण्यात आली आहेत. प्रत्येक निवासी शाळेत संगणक लॅब तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून नवीन गोष्टी सहजरित्या मिळवू शकतात यासाठी सेवा देण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)

६४१ विद्यार्थ्यांना लाभ
४वसतिगृह व निवासी शाळांमध्ये वायफायची सोय करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील ४ वसतिगृह व ३ निवासी शाळांमधील ६४१ विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. गोंदियातील मुलांच्या वसतिगृहात ७५, गोंदियात मुलींच्या वसतिगृहात ८०, तिरोडा येथे ६०, अर्जुनी-मोरगाव ६०, डव्वा येथे १४३, सरांडी येथे ८० तर नंगपुरा मुर्री येथे १४३ विद्यार्थी या वायफायचा लाभ घेऊ शकतात.
पाणी शुद्धीकरण यंत्र
४स्वच्छ पाण्याअभावी विद्यार्थी आजारी पडत होते. त्यामुळे अनेकदा सामाजिक न्याय विभागाची प्रतिमा मलीन व्हायची. परंतु आता निवासी शाळा किंवा वसतिगृहातील विद्यार्थी आजारी पडू नये यासाठी २५ हजार रुपये प्रत्येक ठिकाणी खर्च करुन वॉटर प्युरिफायर (आरो) बसविण्यात आले आहेत.

निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना यापुर्वी सामाजिक न्याय विभागाकडून विशेष गणवेश दिला जात नव्हता. परंतु यंदापासून विद्यार्थ्यांना ड्रेस देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सोयी देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
- मंगेश वानखेडे
सहायक आयुक्त, विशेष समाजकल्याण विभाग, गोंदिया

Web Title: 'Wifi' for hostel and residential schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.