विधवा महिलेचे आमरण उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:02 IST2018-07-12T00:01:31+5:302018-07-12T00:02:35+5:30
खोटे व बनावटी दस्तावेजाचे आधारे विक्रीपत्र तयार करुन शेतजमिनीचे फेरफार केल्याच्या कारणावरुन देऊळगाव/बोदरा येथील मंदा शिवलाल भांडे या विधवा महिलेने बुधवारपाूसन (दि.११) स्थानिक उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

विधवा महिलेचे आमरण उपोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : खोटे व बनावटी दस्तावेजाचे आधारे विक्रीपत्र तयार करुन शेतजमिनीचे फेरफार केल्याच्या कारणावरुन देऊळगाव/बोदरा येथील मंदा शिवलाल भांडे या विधवा महिलेने बुधवारपाूसन (दि.११) स्थानिक उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
शिवलाल भांडे यांची गट क्र. ३५/२ आराजी १.०१ हे.आर. मालकीची शेतजमिन होती. त्यांना दारु पाजून २३ मे रोजी त्यांची हत्या करण्यात आली. या जमिनीचे खोटे दस्तावेज तयार करण्यात आले. आरोपींवर कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल असताना नियमबाह्यपणे जमिनीचे फेरफार करण्यात आल्याचा आरोप उपोषणकर्तीने केला आहे.
पतीच्या मृत्यूनंतर वारसान चढविण्यासाठी अर्ज करुन सुद्धा तलाठ्याकडून वारसान प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विम्यापासून वंचित ठेवण्यात आले. यात मंडळ अधिकारी व तलाठी जबाबदार असल्याचा आरोप करुन सदर फेरफार रद्द करावे व संबंधितांवर कडक कारवाई करावी. या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे . यापूर्वी फेरफार रद्द करण्यासाठी संबंधित अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. मात्र त्यांनी दखल घेतली नसल्याचे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.