सर्व ईव्हीएम मशीन्स गुजरातमधूनच का येतात? प्रफुल्ल पटेल यांचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 14:47 IST2018-05-28T14:47:38+5:302018-05-28T14:47:50+5:30
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी सूरतहून ईव्हीएम मशीन्स कशा काय मागविल्या जातात, असा प्रश्न विचारून खा. प्रफुल्ल पटेल यांनी या मशीन्सच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

सर्व ईव्हीएम मशीन्स गुजरातमधूनच का येतात? प्रफुल्ल पटेल यांचा प्रश्न
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा/गोंदिया
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी सूरतहून ईव्हीएम मशीन्स कशा काय मागविल्या जातात, असा प्रश्न विचारून खा. प्रफुल्ल पटेल यांनी या मशीन्सच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
निवडणुकीतील मतदान हे मतपत्रिकांच्याच माध्यमातून घेतले गेले पाहिजे असे ठाम मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. युरोपीय देशांमध्येही ईव्हीएम मशीन्सचा वापर बंद करण्यात आला असून तेथे मतपत्रिकांचाच वापर केला जात असल्याची जोड त्यांनी पुढे दिली. तसेच उत्तर प्रदेशचे नेते अखिलेश यादव यांनी आपल्याला दूरध्वनीद्वारे, कैराना निवडणुकीत सुमारे ३०० ईव्हीएम मशीन्स नादुरुस्त झाल्याची माहिती दिल्याचे खा. पटेल यांनी सांगितले.
दरम्यान गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन्स बंद असल्याकारणाने कित्येक मतदार परत गेले. काही ठिकाणी मतदान बंद असल्याचेही फलक लावण्यात आले आहेत.