शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

जिल्ह्यातून मंत्रिमंडळात वर्णी कुणाची ? चारही आमदार मुंबईला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 15:31 IST

Gondia Assembly Vidhan Sabha Election 2024 Results : बडोले, रहांगडालेंवर लक्ष, प्रफुल्ल पटेलांची भुमिका महत्वपुर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी (दि. २३) जाहीर झाला. यात राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले, तर जिल्ह्यातही महायुतीने विजयाचा चौकार मारत महाविकास आघाडीचे पानिपत केले. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. त्यात आता गोंदिया जिल्ह्यातून मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागते, याकडे जिल्हावासीयांच्या नजरा लागल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने घटक पक्षात साधलेले योग्य समन्वय, निवडणुकीदरम्यान प्रचाराचे केलेले सूक्ष्म नियोजन, उमेदवार बदलण्याचा निर्णय, लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळत गोंदिया, आमगाव, अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या चारही मतदारसंघांतून महायुतीचे चारही उमेदवार निवडून आणले. तर, प्रथमच काँग्रेसला जिल्ह्यातून भूईसपाट करण्यात महायुतीची खेळी यशस्वी ठरली. निवडून आलेल्या आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आ. राजकुमार बडोले हे २००९, २०१४ व २०२४ असे तिनदा निवडून आले आहे, तर तिरोडा मतदारसंघाचे आ. विजय रहांगडाले हे सन २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये सलग तिसऱ्यांदा निवडून आले. त्यांनी मतदारसंघात सलग तीनदा निवडून येत विजयाची हॅटट्रीक साधली आहे. तर, गोंदियाचे भाजपचे आ. विनोद अग्रवाल आणि आमगावचे आ. संजय पुराम यांचा हा दुसराच टर्म आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडून आलले अर्जुनी मोरगावचे आ. राजकुमार बडोले यांच्या मागे खा. प्रफुल्ल पटेल यांचे बळ आहे. पटेल यांचा हा गृह जिल्हा असल्याने आणि जिल्ह्यावरील पकड अधिक मजबूत करण्यासाठी बडोले यांना मंत्री करण्यासाठी ते निश्चित प्रयत्न करतील यात शंका नाही. त्यामुळे बडोले यांची दुसऱ्यांदा महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. गोंदिया भंडारा जिल्ह्यात भाजपचे अनुभवी व सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून येणारे विजय रहांगडाले यांची सुद्धा भाजपकडून मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबूकमध्ये असून, सर्वांना सोबत घेऊन चालणारा माणूस, अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील भाजपची पकड मजबूत करण्यासाठी त्यांची भाजपकडून मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता असून, जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात तशी चर्चा आहे.

गोंदियाचे आ. विनोद अग्रवाल यांनी ६१ हजार मते घेत गोंदिया विधानसभेच्या इतिहासात प्रथमच कमळ फुलविले आहे. त्यामुळे याचे बक्षीस त्यांना मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

समन्वयातूनच लागणार मंत्रिमंडळात वर्णी या निवडणुकीत जिल्ह्यातून भाजपचे ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे १, असे चार आमदार महायुतीचे निवडून आले आहेत. त्यात नव्या सरकारचा शपथ विधी सोमवारी (दि. २५) होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातून मंत्रि- मंडळात कोणत्या आमदाराची वर्णी लावायची हे महायुतीत समन्वयाने ठरणार आहे. पण, यात खा. प्रफुल्ल पटेल यांच्या शब्दाला निश्चित वजन असणार आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी त्यांनी जिल्ह्यात घेतलेली मेहनत ही सर्वासमोर आहे.

चारही आमदार मुंबईला रवाना आ. विनोद अग्रवाल, राजकुमार बडोले, विजय रहांगडाले, संजय पुराम हे चारही नवनिर्वाचित आमदार रविवारी (दि. २४) मुंबईला रवाना झाले. या चारही आमदारांना शनिवारी सायंकाळीच पक्ष कार्यालयातून रविवारी मुंबई येथे पोहचण्याचा संदेश आला. त्यामुळे हे चारही आमदार रविवारी सकाळी मुंबईसाठी रवाना झाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024gondiya-acगोंदियाBJPभाजपा