शेतकºयांचा बळी गेल्यानंतर जनजागृती का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:17 IST2017-10-29T22:17:21+5:302017-10-29T22:17:45+5:30
परवानगी नसलेल्या कंपन्याच्या कीटकनाशक फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांचा नाहक बळी गेला.

शेतकºयांचा बळी गेल्यानंतर जनजागृती का?
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : परवानगी नसलेल्या कंपन्याच्या कीटकनाशक फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांचा नाहक बळी गेला. त्यानंतर शासन आणि प्रशासनाला या घटनेचे गांभीर्य कळले. यानंतर त्यांनी कीटकनाशक फवारणी करताना कुठली काळजी घ्यायची यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली. मात्र हेच आधी केले असते तर शेतकºयांचा जीव गेला नसता. हे शासन आणि प्रशासनाचे नाकर्तेपण असल्याची टीका सिनेअभिनेते व नाम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मकरंद अनासपुरे यांनी रविवारी येथे केली.
गोंदिया येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. यवतमाळ येथील घटनेकडे शासन आणि प्रशासनाने गांभीर्याने बघितले नाही. जी काळजी प्रशासन आता घेत आहे, ती आधीच घेतली असती तर शेतकºयांच्या कुटुंबांवर हे संकट ओढवले नसते. कीटकनाशक फवारणीमुळे २० ते २५ शेतकºयांचा जीव गेल्यानंतर जर प्रशासनाला जाग येत असेल तर हे दुर्देवच म्हणावे लागेल. आधीच या जिल्ह्यातील शेतकरी सततची नापिकी आणि कर्जामुळे हताश आहेत. त्यातच पिकांवरील कीडरोग नियंत्रणात आणण्यासाठी फवारणी केल्याने जीव गमवावा लागत आहे. हे दोन्ही चित्र फार दुर्देवी आहे. प्रशासनाने या घटनेचे वेळीच गांभीर्य ओळखून उपाय योजना करण्याची गरज होती, असेही ते म्हणाले.
सरकारच्या नाकर्तेपणामुळेच शेतकरी आत्महत्या
लागवड खर्चाच्या तुलनेत अद्यापही शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. परिणामी शेतकºयांवरील कर्जात सातत्याने वाढ होते. त्यातच बाजारपेठेतील दलालांकडून शेतकºयांचे आर्थिक शोषण केले जात आहे. जोपर्यंत या सर्व गोष्टींचे चित्र बदलणार नाही. तोपर्यंत शेतकरी समृद्ध आणि सुखी होणार आहे. शेतकरी विरोधी धोरणे आणि धारणेमुळेच शेतकºयांची आज ही स्थिती आहे. शेतकरी आत्महत्या या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच होत असल्याचा आरोप अनासपुरे यांनी केला.