नवेगावबांध-नागपूर बसचे स्वागत
By Admin | Updated: April 23, 2015 00:45 IST2015-04-23T00:45:08+5:302015-04-23T00:45:08+5:30
नवेगावबांध येथून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून नागपूरला जलद बस सकाळी ६.३० वाजता धावते.

नवेगावबांध-नागपूर बसचे स्वागत
महामंडळाचे कौतुक : प्रवासी सुखावले
बाराभाटी : नवेगावबांध येथून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून नागपूरला जलद बस सकाळी ६.३० वाजता धावते. परत त्याच दिवशी नागपूर ते नवेगावबांधकरिता सायंकाळी ५.३० ला नागपूरवरुन येते. ही एक मोलाची संधी महामंडळाने नागरिकांना प्राप्त करुन दिली. नागरिकांना काही कार्यालयीन कामे आटोपून एवढ्या मोठ्या अंतरावरुन स्वगावी एकाच दिवशी परत येण्याची सोय झाली आहे.
तालुका अर्जुनी मोरगाव गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असल्याचा गवगवा आहे. मात्र परिस्थितीशी झगडताना असलेल्या संपूर्ण राज्यात केंद्रापासून तर प्रत्येक जिल्ह्यात भारतीय जनतापार्टी शासनकर्ते आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून नागपूर विभागात शहरापासून तर खेड्यापर्यंत धावणारी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस काही भागात पोहोचत नाही. याच प्रकारातला हा एक नागपूर ते नवेगावबांध या मार्गावर धावणाऱ्या एस.टी.चा आहे. मात्र महामंडळाची बस धावताना जवळजवळ एक महिन्याचा कालावधी झाला आहे. सर्वसामान्य जनतेच्या समस्या ओळखून एस.टी. महामंडळाने गोरगरीब, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच शासकीय व निमशासकीय आणि कंत्राटी पद्धतीवर काम करणारे कर्मचारी सुद्धा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी.ने प्रवास करतात. नवेगावबांध ते नागपूर मार्गावर धावणाऱ्या एस.टी.मुळे सामान्य जनता व प्रवाशी यांना सुगीचे दिवस आले आहे. या बसमुळे प्रतिष्ठित नागरिक आपल्या स्वागतार्थ भावनेचे उत्कंठादायक मोलाचे उद्गार काढतात. नवेगावबांध ते नागपूर मार्गावर धावणाऱ्या एस.टी.चे नवेगावबांध, मुंगली, भिवखिडकी, खोली, बोंडे, डोंगरगाव, कान्होली, कोहलगाव, धाबेपवनी, परसोडी रैयत, चान्ना, कोडका, जांभळी, एलोडी, रामपुरी इत्यादी आजूबाजूच्या परिसरातून प्रवास करतात. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी.चे नागरिकांकडून स्वागत आहे. जि.प.सदस्य मधुकर मरस्कोल्हे, पं.स. सदस्य महादेव बोरकर, पं.स. सदस्य किशोर तरोणे, माजी आ. दयाराम कापगते, के.ए. रंगारी, श्रीमती विशाखा साखरे, माजी जि.प. सदस्य संग्रामे, ऋषी पुस्तोडे, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. (वार्ताहर)