ऐन दिवाळीतही भारनियमनाचा शॉक
By Admin | Updated: October 26, 2014 22:41 IST2014-10-26T22:41:51+5:302014-10-26T22:41:51+5:30
सर्वात मोठा सण म्हणून साजरा करण्यात येत असलेल्या दिवाळीच्या सणातही महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने आपल्या निष्ठुरतेची हद पार केली. ऐन दिवाळीच्या दिवशीही वीज पुरवठा खंडीत

ऐन दिवाळीतही भारनियमनाचा शॉक
गोंदिया : सर्वात मोठा सण म्हणून साजरा करण्यात येत असलेल्या दिवाळीच्या सणातही महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने आपल्या निष्ठुरतेची हद पार केली. ऐन दिवाळीच्या दिवशीही वीज पुरवठा खंडीत करण्यात आल्याचा प्रकार घडला. शिवाय हा दररोजचाच प्रकार बनल्याने महावितरणच्या या कृत्यामुळे मात्र नागरिकांत चांगलाच रोष दिसून येत आहे.
राज्यात सर्वाधीक वीज उत्पादन करणारा प्रकल्प जिल्ह्यात उभा असूनही बाहेरचे सुखात असून घरची मंडळीच उपाशी मरत असल्यागत स्थिती जिल्हावासीयांची झाली आहे. अन्य दिवसांत तर ठिक आहे मात्र सणासुदीत तरी भारनियमनाचा फटका पडू नये अशी अपेक्षा नागरिकांची आहे. मात्र महावितरणला लोकांकडून फक्त पैसे घेणे असून त्यामोबदल्यात मात्र काहीच देणे नसल्याचे स्पष्ट चित्र आहे. यामुळेच सणासुदीलाही लक्ष न देता महावितरणकडून भारनियमन जाणून केलेच जात असल्याचा अनूभव हमखास येतो.
हाच प्रकार ऐन दिवाळीच्या दिवशीच काय दिवाळीच्या पाचही दिवसांत अनूभवायला मिळाला. दिवाळीच्या दिवशी दिवसा भारनियमन करण्यात आले होते. तर त्या नंतरही दररोजचे भारनियमन सुरूच आहे. विशेष म्हणजे वेळी-अवेळी वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांची कामे अडतात. तर शहराची बाजारपेठ जिल्ह्यासह लगतच्या राज्यांपर्यंत प्रसिद्ध असल्याने तेथील नागरिक खरेदीसाठी गोंदियाच्या बाजारपेठेत येतात. अशात वीज पुरवठा खंडीत झाल्यास त्यांच्या व्यापारावर परिणाम तर पडतो. शिवाय घरगुती क ामे अडून पडतात. अन्य दिवसांची तर शहरच काय जिल्हावासीयांनी सवय बनवून घेतली आहे. मात्र दिवाळी सारख्या सणांत महावितरण नागरिकांना देत असलेला शॉक असहनीय होत असल्याच्या प्रतिक्रीया नागरिकांतून उमटत आहेत. वीज चोरीची टक्केवारी सांगत महावितरण भारनियमन करीत असल्याचे सांगते. मात्र वीज चोरांना सोडून सामान्य नागरिकांना याचा फटका सहन करावा लागत असल्याने नागरिकांत अधिकच रोष दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)